Kamal Haasan Birthday :  फक्त हॉटेल बुक करता येत नव्हतं म्हणून कमल हासन यांनी केलं होतं सारिकाशी लग्न....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 08:00 AM2021-11-07T08:00:00+5:302021-11-07T08:00:06+5:30

Kamal Haasan Birthday : साऊथ सुपरस्टार कमल हासन यांचा आज वाढदिवस. 1954 मध्ये आजच्याच दिवशी कमल हासन यांचा जन्म झाला होता.

birthday special Lost Love Stories : Kamal Haasan And Sarika | Kamal Haasan Birthday :  फक्त हॉटेल बुक करता येत नव्हतं म्हणून कमल हासन यांनी केलं होतं सारिकाशी लग्न....!!

Kamal Haasan Birthday :  फक्त हॉटेल बुक करता येत नव्हतं म्हणून कमल हासन यांनी केलं होतं सारिकाशी लग्न....!!

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांचा आज वाढदिवस (Kamal Haasan Birthday ). 1954 मध्ये आजच्याच दिवशी कमल हासन यांचा जन्म झाला होता. 1959 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढे हिरो म्हणून  एन्ट्री झाली आणि त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं 
‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटात ते लीड हिरो म्हणून झळकले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.  कालांतराने बॉलिवूडमध्येही त्यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला.  

‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यानंतर त्यांनी सागर,गिरफ्तार, जरा सी जिंदगी, राज तिलक, एक नई पहेली, चाची 420, हे राम अशा अनेक हिंदी सिनेमांत त्यांनी अभिनय केला. त्यांच्या सिनेमांइतकंच त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं.

कमल हासन यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्यात. यापैकी दोघींशी त्यांनी लग्न केलं. दोघींशी त्यांचं अफेअर चर्चेत राहिलं. एकीसोबत ते 13 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. पण काळासोबत ही सगळी नाती संपुष्टात आली. खरे तर कमल हासन यांचा विवाह संस्थेवर कधीच विश्वास नव्हता. विवाहसंस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही, असं कमल हासन यांनी ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

‘लोक केवळ दबावामुळे लग्न करतात असं मला वाटतं. माझ्या मनासारखं झालं असतं तर मी कधीच लग्न केलं नसतं. केवळ माझ्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांच्या इच्छेखातर मी लग्न केलं. वाणीला लिव्ह- इन मध्ये राहायचं नव्हतं तर सारिका आणि मला दोन मुली झाल्यानंतरही हॉटेल रूम बुक करता येत नव्हती म्हणून आम्ही लग्न केलं,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

70च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत कमल हासन यांचं अफेअर होतं. दोघांनी काही सिनेमेसुद्धा एकत्र केले होते. मात्र फार काळ दोघांचं अफेअर टिकलं नाही. 1978 साली कमल यांनी वाणी गणपतीसोबत पहिलं लग्न केलं होतं. दहा वर्षे हे लग्न टिकलं आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचं कारण  होतं सारिका.

वाणी गणपतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासन यांच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची  एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केलं. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत.  पण 2004 मध्ये कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

सारिकापासून दुरावल्यानंतर कमल हासन त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या सिमरनच्या प्रेमात पडले. त्यावेळी या नात्याची बरीच चर्चा झाली. पण सिमरने आपल्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केलं आणि कमल हासन पुन्हा एकाकी पडले.
तिच्यानंतर गौतमी  कमल यांच्या आयुष्यात आली. कमल व गौतमी 13 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. पण 2016 मध्ये गौतमीने स्वत: कमल हासन यांच्यासोबतचे नातं तोडल्याचं जाहीर केलं होतं.

Web Title: birthday special Lost Love Stories : Kamal Haasan And Sarika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.