Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:58 AM2019-03-14T11:58:22+5:302019-03-14T11:59:47+5:30

मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता.

Birthday Special: rohit shetty irons tabu saree in film haqeqat | Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!!

Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!!

googlenewsNext
ठळक मुद्देरोहित शेट्टीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. ‘फूल और कांटे’ या अजय देवगणच्या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रोहितने करिअरची सुरुवात केली. पुढे याच अजयसोबत रोहितने १० चित्रपट केलेत.

मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. रोहितने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. अलीकडे रिलीज झालेला त्याचा ‘सिम्बा’ हा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरला. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. संघर्षाच्या काळात अभिनेत्री तब्बूच्या साड्या प्रेस करण्याचे कामही त्याला करावे लागले. काजोलचा स्पॉटबॉय म्हणूनही त्याने काम केले. 

रोहित शेट्टी हा सुप्रसिद्ध स्टंटमन आणि विलेन एम बी शेट्टीचा मुलगा आहे. वडिलांच्या निधनानंतर दोन बहिणी आणि आईची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर आली. आजही ते दिवस आठवले की रोहित भावूक होतो.

एका मुलाखतीत रोहितने संघर्षाच्या या काळाबद्दल बोलला होता.  रोहितची पहिली कमाई ३५ रूपये होती. घर चालवण्यासाठी पैसे नव्हते. शिक्षण सुरु ठेवले असते तर तो घर चालवू शकलो नसता. अखेर त्याने कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि काम सुरु केले. हे काम काय तर १९९५ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटाच्या सेटवर तब्बूच्या साड्या प्रेस करण्याचे कामही त्याने केले. काजोलचा स्पॉटबॉय तिचे टचअप करण्याचे काम स्वीकारले.
अखेर रोहित शेट्टीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. ‘फूल और कांटे’ या अजय देवगणच्या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून रोहितने करिअरची सुरुवात केली. पुढे याच अजयसोबत रोहितने १० चित्रपट केलेत.

२००३ मध्ये  रोहितने दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमायचे ठरवले. त्याचा पहिला चित्रपट होता ‘जमीन’. या चित्रपटात अजय देवगण हा हिरो होता. पण हा चित्रपट आपटला. त्या एका फ्लॉपनंतर लोकांनी रोहितचे फोन उचलणे बंद केले होते. या काळात फक्त एक व्यक्ती रोहितसोबत होती, ती म्हणजे अजय देवगण. त्यामुळेच आज मी जो काही आहे, ते केवळ अजयमुळे. तो कायम माझा सपोर्ट सिस्टिम बनून राहिला, असे रोहित नेहमी सांगतो.
 पुढे त्याने अजय देवगणसोबत ‘गोलमाल’ बनवला. रोहितची मेहनत फळली आणि ‘गोलमाल’ सुपरडुपर हिट झाला. यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘गोलमाल’चे आत्तापर्यंत चार पार्ट आलेत आणि या चारही चित्रपटांनी बक्कळ कमाई केली.

Web Title: Birthday Special: rohit shetty irons tabu saree in film haqeqat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.