सुप्रियांनी सचिन यांना लगेच दिला होता लग्नासाठी होकार? प्रेम होतंच, पण आणखी एक कारण होतं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:56 AM2021-08-17T10:56:02+5:302021-08-17T10:58:12+5:30

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. आज या दोघांचाही वाढदिवस.

birthday special sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar love story | सुप्रियांनी सचिन यांना लगेच दिला होता लग्नासाठी होकार? प्रेम होतंच, पण आणखी एक कारण होतं...!

सुप्रियांनी सचिन यांना लगेच दिला होता लग्नासाठी होकार? प्रेम होतंच, पण आणखी एक कारण होतं...!

googlenewsNext
ठळक मुद्देसुप्रिया यांनी बारावी बोर्डाची प्रिलीम परिक्षा दिली नव्हती. कॉलेजकडून सुप्रिया यांच्या घरी परिक्षा दिली नसल्याचं लेटर गेलं. त्यानंतर सुप्रिया व सचिन यांच्या प्रेमाचं बिंग फुटलं.

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) व सुप्रिया पिळगावकर ( Supriya Pilgaonkar).  आज या दोघांचाही वाढदिवस. एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग ख-या आयुष्यात लग्नबंधनात अडकलेत. हे सुंदर जोडपं एकमेकांच्या प्रेमात कसं पडलं, हेच आज आम्ही सांगणार आहोत.  
तर ‘नवरी मिळे नव-याला’  या चित्रपटाच्या सेटवर सचिन आणि सुप्रिया या दोघांचीही पहिली भेट झाली होती. सचिन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तसेच ते सिनेमात अभिनय देखील करीत होते. तर सुप्रिया चित्रपटाच्या हिरोईन होत्या. सुप्रियांच्या गालावरची सुंदर खळी पाहून सचिन त्यांच्यावर भाळले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही प्रेमकहाणी फुलली होती. परंतु  दोघांनीही आपलं  नातं काही काळ लपवून ठेवले. यामागचं कारण अर्थातच एकच होतं, ते म्हणजे एक अभिनेत्री दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अशी चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती. ( Sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar love story )

 सुप्रिया उण्यापुºया 17 वर्षांच्या होत्या तर सचिन 27 वर्षांचे. म्हणजेच दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक होता. यामुळं हे नातं फार काही टिकणार नाही, असा सर्वांचा समज होता. पण या जोडप्यानं हा समज खोटा ठरवला. गेल्या 32 वर्षांपासून हे जोडपं आनंदात नांदतंय.

सचिन यांनी ‘नवरी मिळे नव-याला’ या चित्रपटाच्या सेटवर सुप्रिया यांना पाहिलं आणि  पाहत्याक्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले होते.  मात्र सुप्रिया यांना मनातल्या भावना कशा सांगायच्या, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता.  काही केल्या सुप्रियांशी बोलायचे धाडस त्यांना होईना. पण एक दिवशी हिंमत करुन ते सुप्रियाकडे गेले आणि त्यांनी त्यांना  लग्नाबद्दल विचारलेच. यावर सुप्रिया काय म्हणाल्या होत्या माहितीये? ‘अहो मला वाटलं तुमचं लग्न झालं असेल,’असं सुप्रिया म्हणाल्या. सुप्रिया आपली टिंगल करत आहेत, असंच त्यांचं ते वाक्य ऐकून सचिन यांना वाटलं. पण नंतर  सुप्रिया गंभीर आहेत, हे पाहून त्यांनी आपण अजूनही सिंगल असल्याचं सांगितलं.

सुप्रिया यांनी सचिन यांना लग्नाला होकार का दिला,हे माहितीये? तर सुप्रिया यांनी सचिन यांचे बालपणीचे अनेक चित्रपट पाहिले होते. सचिन यांचे बालपणीचे ते रुप त्यांना फार आवडायचे. विश्वास बसणार नाही पण सचिन यांच्याशी लग्न केल्यावर आपल्यालाही त्यांच्या बालपणीच्या रुपाप्रमाणेच गोंडस मुलं होणार, असा आणि इतकाच भोळाभाबडा विचार करत सुप्रिया लग्नाला होकार दिला होता.


 
सुप्रिया यांनी  सुरुवातीला सचिन व त्यांच्या नात्याबद्दल   घरी सांगितलं नव्हतं. सचिन हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव होतं आणि सुप्रिया केवळ 17 वर्षांच्या होत्या. दोघांमध्ये तब्बल 10 वर्षांचं अंतर होतं. घरच्यांना ही गोष्ट समजली तर ते कसे रिअ‍ॅक्ट होतील याची भीती सुप्रिया यांना  होती. 

सुप्रिया यांनी बारावी बोर्डाची प्रिलीम परिक्षा दिली नव्हती. कॉलेजकडून सुप्रिया यांच्या घरी परिक्षा दिली नसल्याचं लेटर गेलं. त्यानंतर सुप्रिया व सचिन यांच्या प्रेमाचं बिंग फुटलं. पण सुप्रियाच्या घरच्यांनी शांतपणे ही स्थिती हाताळली. काही दिवसांनंतर ते सचिन यांच्या आई-वडिलांना भेटले आणि अवघ्या सहा महिन्यांनंतरच सचिन  व सुप्रिया यांचं लग्न झालं.
 

Web Title: birthday special sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.