Birthday special : आज आहे ब्रूस लीचा बर्थ डे! डोकेदुखीच्या गोळीने घेतला या महान फाईटरचा जीव!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 07:04 AM2017-11-27T07:04:27+5:302017-11-27T13:47:19+5:30
ब्रूस ली म्हणजे मार्शल आर्टचे दुसरे नाव होते. २७ नोव्हेंबर १९४० रोजी जन्मलेल्या ब्रूस लीचा आज (२७ नोव्हेंबर)वाढदिवस. बु्रस ...
त्याच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यात ब्रूस ली हा केवळ एक वेळा मार्शल आर्ट स्पर्धेत हरलेला आहे. बाकी संपूर्ण आयुष्य तो अजिंक्य राहिला. ब्रूस ली ला पाण्यापासून नेहमी भीती वाटायची कारण त्याला पोहणे येत नसे. तुम्हाला ठाऊक नसेल, पण १९६३ साली त्याने अमेरिकन सैन्यात दाखल होण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कमजोर दृष्टीमुळे त्याला सैन्यभरतीकरिता अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर त्याने कॉन्टक्ट लेन्सचा वापर सुरु केला होता.
१९६० च्या काळात मार्शल आर्ट शिकविण्याची ब्रूस लीची फी २५० डॉलर एवढी होती. त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. ब्रूस ली कोणापासूनही ३ फुट दूर उभे राहून सेकंदाचा ५वा हिसा ०.०५ सेकंदात जोरदार ठोसा मारू शकत होता. त्या काळात कोका कोलाच्या कॅन आजच्या पेक्षा अधिक जाड असायच्या. ब्रूस ली आरामात त्या कॅनला त्यांच्या बोटाने छिद्र पाडायचा.
आपल्या शरीरात ज्या ग्रंथिमुळे घाम तयार होतो ती ग्रंथीच ब्रूस लीने शस्त्रक्रिया करून काढून टाकली होती.
ब्रूस ली च्या मृत्यूची बातमी अचानक येऊन धडकली अन् सगळ्यांनाच धक्का बसला होता. २० जुलै १९७३ रोजी वयाच्या केवळ ३२ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू वेदनाशामक गोळ्यांच्या अॅलर्जीमुळे झाल्याचे मानले जाते. डोकेदुखीच्या त्रासासाठी ब्रूस ली पेनकिलर घ्यायचा. त्याच्या शवविच्छेदन अहवालानुसार, ब्रूस ली सेलेब्रल एडेमा नावाच्या आजाराने ग्रासलेला होता. या आजारात मेंदूला सूज येते.
पोलिस नोंदीनुसार, १९७३ रोजी ‘एन्टर द ड्रॅगन’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अचानक ब्रूस लीचा मृत्यू झाला. त्याला चक्कर आला आणि तो बेशूद्ध पडला. रूग्णालयाच्या वाटेवरच त्याची प्राणज्योत मालवली. पण ब्रूस लीच्या मृत्यूबद्दल एक वादग्रस्त कथाही ऐकवली जाते. त्यानुसार, ब्रूस लीने एका अमेरिकन महिलेशी लग्न केले होते. त्यांची दोन मुलेही होती. ब्रूस लीचा मृतदेह त्याच्या याच अमेरिकन पत्नीच्या खोलीत आढळल्याचे म्हटले जाते. ब्रूस लीला त्याच्या बायकोनेच विष देऊन संपवले, असे म्हटले जाते. (अमेरिकेला चीनी ब्रूस लीची लोकप्रीयता बघवली नाही. म्हणून त्यांनी आपल्या एजंटद्वारे ब्रूस लीचा काटा काढला. ही एजंट दुसरी कुणी नसून त्याची कथित अमेरिकन पत्नी होती, असाही एक दावा केला जातो.) ब्रूस लीच्या चाहत्यांच्या मते, आपल्या लाडक्या स्टारची हत्या झाली हे पचवणे लोकांना जड गेले असते. त्यामुळे पोलिसांनीच त्याच्या आकस्मिक मृत्यूची खोटी बातमी जाहिर केली.