बर्थ डे स्पेशल : आएशा टाकियाच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 04:55 PM2018-04-10T16:55:24+5:302018-04-10T16:57:16+5:30
बॉलिवूड अभिनत्री आएशा टाकियाचा आज 32वा वाढदिवस आहे. आएशा टाकियाचा जन्म 10 एप्रिल 1986 मध्ये मुंबईतील एका गुजराती परीवारात झाला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनत्री आएशा टाकियाचा आज 32वा वाढदिवस आहे. आएशा टाकियाचा जन्म 10 एप्रिल 1986 मध्ये मुंबईतील एका गुजराती परीवारात झाला होता. आएशाचे वडील महाराष्ट्रीयन तर आई फरिदा ब्रिटीश आहे. आएशाने 2004 मध्ये टार्जन द वंडर कार या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.
'वॉन्टेड'मुळे मिळालं नाव
आएशाने सर्वात पहिले 'सोचा ना था' या सिनेमात काम केलं होतं. पण त्याआधी तिचा 'टार्जन द वंडर कार' हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. सलमान खानसोबत काम करुन आएशा चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर आएशाने दिल मांगे मोर, शादी नंबर-1, शादी से पहले, कॅश, पाठशाला, दे ताली सारख्या सिनेमात काम केले होते.
साऊथच्या सिनेमातही धमाका
बॉलिवूडसोबतच आएशाने तेलगु सिनेमातही काम केलंय. आएशाने चार वर्षांची असताना पासूनच फॅशन विश्वात काम सुरु केलं होतं. 15 व्या वर्षी तिने फाल्गुनी पाठकसोबत एका व्हिडीओत काम केलं होतं. त्यानंतर तिने 'शेक इट बेबी' या अल्बममध्येही काम केलं होतं.
ब्रेस्ट प्लांटमुळे चर्चेत
आएशा सिनेमांसोबतच वादातही अनेकदा सापडली. आएशाने वॉन्टेड आणि संडे सिनेमात लिड रोल केले होते. याच दरम्यान ती ब्रेस्ट प्लांटमुळे वादात सापडली होती. आएशाने ब्रेस्ट प्लांट केल्याची चर्चा झाली होती. पण यावर तिने कधीही स्पष्टीकरण दिलं नाही.
लिप सर्जरीचे फोटो व्हायरल
आएशा लिप सर्जरीमुळेही चर्चेत आली होती. तिचे काही लिप सर्जरीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. असे काही केल्याचे तिने नाकारले होते. पण फोटोंमध्ये सगळे दिसत होते. या सर्जरीनंतर तिच्या लोकप्रियतेत मोठी घसरण बघायला मिळाली. त्यानंतर आएशाने नेते अबू आझमी यांच्या मुलासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे.
सास-याच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी
आएशा नेहमीच आपल्या पतीमुळे आणि सास-यांमुळे चर्चेत रहाते. पती फरहान आणि आएशाने अबू आझमी यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती, ज्यात त्यांनी लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणा-या महिलांना फाशी द्यायला हवी, असे म्हटले होते.