ज्येष्ठ कवी, दिग्दर्शक गुलजार यांचा आज वाढदिवस
By Admin | Published: August 18, 2016 08:50 AM2016-08-18T08:50:15+5:302016-08-18T08:55:17+5:30
ज्येष्ठ कवी, लेख, गीतकार, दिग्दर्शक अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा आज (१८ ऑगस्ट) जन्मदिन.
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १८ - ज्येष्ठ कवी, लेख, गीतकार, दिग्दर्शक अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा आज (१८ ऑगस्ट) जन्मदिन.
गुलज़ार यांचे मूळ नाव राम पूरणसिंह कालरा. १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना ( सध्याचे पाकिस्तान) येथे त्यांचा जन्म झाला.
बालपण
गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. जेव्हा गुलजार महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले.
फाळणीनंतर
हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळाचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली.
नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली.
गुलज़ार यांची गीतशैली
गुलज़ार हे हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीने परिचित आहेत. गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा वापरलेल्या आढळतात.
उदाहरण म्हणून काही गीते
’सत्या” चित्रपटील अतिशय लोकप्रिय गीत- "सपने में मिलती हैं!" हे गीत नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरून अगदी हृदयंगम झाले आहे. बंटी और बबली मधील 'कजरारे' हे गाणे असो. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी भरपूर असते.
गुलज़ार-एक गीतकार
गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
आनंद (१९७०)
ओंकारा(२००६)
खामोशी (१९६९)
गुड्डी (१९७१)
जान-ए-मन(२००६)
थोडीसी बेवफाई, दो दूनी चार (१९६८)
नमकहराम (१९७३)
बंटी और बबली(२००५)
बावर्ची (१०७२)
सफर (१०७०)
गुलजार यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
अंगूर (१९८१)
अचानक (१९७३)
आँधी (१९७५)
किनारा (१९७७)
कोशिश (१९७२)
खुशबू (१९७५)
नमकीन (१९८२)
परिचय (१९७२)
मीरा (१९७९)
मेरे अपने (१९७१)
मौसम (१९७५)
लेकिन (१९९०)
गुलजार यांची पुस्तके
बोस्की (कवितासंग्रह)
तक़सीम (हिंदी कथासंग्रह)
देवडी (मूळ हिंदी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद-अनुवादक अंबरीश मिश्र)
धुआँ ( हिंदी कथासंग्रह)
सौजन्य : मराठी विकिपीडिया