'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम

By जयदीप दाभोळकर | Published: January 20, 2021 01:21 PM2021-01-20T13:21:37+5:302021-01-20T13:30:27+5:30

अनेक ठिकाणी तांडव या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आल्या तक्रारी

bjp leader ram kadam criticize maharashtra government on amazon prime tandav web series and warns bollywood film industry | 'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम

'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी तांडव या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आल्या तक्रारीराज्य सरकार तांडवच्या टीमला वाचवू पाहत आहे, राम कदम यांचा आरोप

हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमची वेब सीरिज तांडव ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांडव या वेब सीरिजविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसंच केंद्रानंही याची दखल घेतली आहे. दरम्यान, या वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्ये काढली जात नाहीत तोवर यावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं भाजप नेते राम कदम यांनी सांगितलं होतं. तसंच या वेब सीरिजविरोधात उत्तर प्रदेशात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांची एक टीमही आली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

"तांडव या वेब सीरिजवरील तक्रारीच्या चार दिवसांनंतरही महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलिसांना एफआयआर करण्यापासून थांबवलं आहे. आता तांडव काय असतं हे आम्ही चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ. आमच्या विश्वासावर आम्ही कोणालाही प्रहार करून देणार नाही," असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
"योगी सरकारच्या पोलिसांचा सर्व राम आणि शिव भक्तांकडून मुंबईत स्वागत आहे. जे काम ठाकरे सरकारला करायला हवं होतं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. ४ दिवस होऊन गेले आहेत. अजूनही महाराष्ट्र सरकार तांडवच्या टीमला वाचवू पाहत आहे," असा आरोपही कदम यांनी केला आहे.





दिग्दर्शकाकडून माफी

तांडव वेब सीरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून, याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या वेबसीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून पोलिसांची चुकीची प्रतीमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 



दरम्यान, तांडव वेबसीरीज पूर्णपणे काल्पनिक आहे. यामधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असला तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून, कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची कोणत्याही अटीविना माफी मागतो, असं जफर यांनी म्हटलं आहे.

Web Title: bjp leader ram kadam criticize maharashtra government on amazon prime tandav web series and warns bollywood film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.