इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:35 PM2023-12-11T13:35:44+5:302023-12-11T13:38:07+5:30

 'जमाल कुडू' हे गाणे तर इंटरनेट सेनसेशन बनलं आहे.  सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'जमाल कुडू'ची चर्चा आहे.

Bobby Deol’s Animal entry song ‘Jamal Kudu’: Origin, meaning and lyrics of the internet sensation | इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

इंटरनेट सेनसेशन बनलं 'अ‍ॅनिमल'मधील 'जमाल कुडू'; पण गाण्याचा अर्थ काय रे भाऊ?

'ॲनिमल' सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, अनिल कपूर या मल्टीस्टारर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमात बॉबी देओलने काहीही न बोलता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भूरळ पाडली. विशेष म्हणजे या सिनेमातील  'जमाल कुडू' हे गाणे तर इंटरनेट सेनसेशन बनलं आहे.  सध्या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'जमाल कुडू'ची चर्चा आहे. पण, या गाण्याचा अर्थ काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 

'ॲनिमल' मध्ये बॉबी देओलची एन्ट्री होते, तेव्हा 'जमाल कुडू' हे गाणे वाजते. बॉबी देओलच्या जबरदस्त एन्ट्रीने आणि 'जमाल कुडू' गाण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. अखेर 'जमाल कुडू' गाण्याच्या ऑडिओ रिलीज करण्यात आला आहे. खरं तर, 'जमाल कुडू' हे गाणं इराणमधील 'जमाल जमालू' या गाण्यापासून प्रेरित आहे.  

पहिल्यांदा हे गाणे 1950 च्या दशकात खाराझेमी गर्ल्स हायस्कूलमधील मुलींच्या गायन मंडळाने गायले होते. यानंतर गेल्या काही वर्षांत ते इराणमध्ये लग्नात वाजवले जाणारे लोकप्रिय गाणे बनले. प्रसिद्ध इराणी कवी बिजान स्मंदर यांनी लिहिलेल्या कवितेतून हे गाणे तयार करण्यात आले आहे. 

 गाण्यातील 'Vay Siyah Zangi Delamo Nakon Khun Vay To Rafti Safar Shodam Cho Majnun' याचा अर्थ आहे की, अरे काळ्या डोळ्यांचं सोंदर्य असलेल्या प्रिया, तु क्रूरतेने माझे हृदय तोडू नकोस...तू मला सोडून नवीन प्रवासाला निघाला आहेस...पण, जर तु मला सोडलेस तर मी मजनूसारखा वेडा होऊन भटकेल. तर गाण्याची हुक लाइन 'Jamal Jamalek Jamaloo Jamal Kudu’  याचा अर्थ आहे, अरे माझ्या प्रेमा, माझ्या प्रिया, माझं गोड प्रेम’. तर जमाल शब्दाचा अर्थ आहे 'चमकदार'. 

'ॲनिमल' साठी संगीतकार हर्षवर्धन रामेश्वर यांनी पारंपारिक इराणी बंदरी संगीत शैली आधुनिक ट्रॅकसाठी संगीतबद्ध केली.  2 मिनिटे 14 सेकदांचे हे गाणे यूट्यूबवर 27,649,167 लोकांनी पाहिले आहे. तर 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा भारतासह जगभरात बंपर कमाई करत आहे. ॲनिमल सिनेमाने यावर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण आणि गदर 2 सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा यंदाच्या वर्षातील हीट सिनेमांपैकी एक सिनेमा ठरला आहे. 

Web Title: Bobby Deol’s Animal entry song ‘Jamal Kudu’: Origin, meaning and lyrics of the internet sensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.