'बोक्या सातबंडे'ला लाभली दिलीप प्रभावळकरंlच्या आवाजाची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 07:16 PM2023-05-16T19:16:19+5:302023-05-16T19:16:48+5:30
सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला 'बोक्या सातबंडे' आता रंगभूमीवर अवतरलेला आहे.
दिलीप प्रभावळकर यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे, व त्यांच्यामधील विवीध अभिनयगुणांना वाव देतील असे सिनेमे व नाटके केली आहेत. मराठी रंगभूमी, मालिका, मराठी हिदी चित्रपट माध्यमातून त्यांनी नावाप्रमाणेच आपला प्रभाव कायम ठेवला आहे. ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून अवतरलेली 'बोक्या सातबंडे' कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती सर्वांनाच माहित आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला 'बोक्या सातबंडे' आता रंगभूमीवर अवतरलेला आहे. पुणे-मुंबईतील बालक अणि पालक यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगाला मुलं दाद देत होती नाटकाच्या शेवटी तर मुले रंगमंचावर आली आणि पालक हौशेने आपल्या मुलासह आनंद लुटताना दिसली. बोक्या सातबंडे या बालनाट्यात दिलीप प्रभावळकर सहभागी झालेत. रंगमंचावर प्रत्यक्ष ते दिसत नसले तरी ते त्याच्या आवाजातून नाटकात महत्वाची भूमिका निभावतात! नाटकात मोजकेच पण प्रभावी परिणामकारक असे त्यांचे संवाद लक्षणीय ठरतात.
निर्माते आहेत दिनू पेडणेकर, रणजित कामत, राहुल कर्णिक, आणि दीप्ती प्रणव जोशी. अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटरची निर्मिती असलेल्या 'बोक्या सातबंडे' या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केलं असून, विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या नाटकाची दृष्य-संकल्पना केली आहे प्रणव जोशी यांनी तर, मिलिंद शिंत्रे या नाटकाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत, सहायक दिग्दर्शक-अभिनव जेऊरकर, नाटकातील गीत वैभव जोशी आणि संगीत निनाद म्हैसाळकर यांचे आहे. नाटकाचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनीच सेटची संकल्पना आणि उभारणी केलेली आहे. दृष्य संकल्पना प्रणव जोशी, प्रकाश योजना राहूल जोगळेकर, वेशभूषा महेश शेलार, रंगभूषा कमलेश बिचे आणि कोरिओग्राफी संतोष भांगरे यांची असून पोस्टर डिझाइन केलंय गौरव सर्जेराव, अॅडडीशनल ग्राफिक कौस्तुभ हिंगणे,फोटोग्राफी भारत पवार,सूत्रधार श्रीकांत तटकरे, प्रोडक्शन मॅनेजर दिनेश चंद्रकांत,वरुणजोशी,नेपथ्यनिर्माण प्रकाश परब आणि मंडळी,रंगमंच व्यवस्था नीरज कळढोने, पुर्वा लांडगे,ओंकार गुरव, लाइट ऑपरेटर मयूर, म्युझिक ऑपरेटर अजय बोराटे, साहस दृश्ये- राकेश पाटील यांची.
ही आहेत कलाकार मंडळी
आरुष प्रसाद बेडेकर या नाटकात टायटल रोलमध्ये आहे. त्याच्या जोडीला यश शिंदे, सायली रामदास रामेश्वरी, ओंकार यादव, अंकुश काणे, स्वाती काळे, अमृता कुलकर्णी, सौरभ भिसे, प्रथमेश अंभोरे, आकाश मांजरे, स्नेहा धडवई, सागर पवार, शीवांश दीप्ती प्रणव जोशी आदि कलाकार या नाटकात आपल्या अभिनयाद्वारे रंग भरतात. पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतोय. नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणार आहे.