'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:31 PM2024-10-11T13:31:26+5:302024-10-11T13:33:34+5:30

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांना ओळखले जाते.

bollywood actor amitabh bachchan birthday trishul movie sequel announcement after 46 years by anand pandit | 'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

Amitabh Bachchan : भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांना ओळखले जाते. जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. १९६९ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज ११ ऑक्टोबरच्या दिवशी 'बिग बी' त्यांचा ८२ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. 


'मीड डे'ला दिलेल्या मुलाखतीत आनंद पंडित यांनी याबाबत खुलासा केलाय. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "हा चित्रपट म्हणजे अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याच्याकडे काहीही नसताना तो शहराची वाट धरतो आणि स्वत: चं वेगळं विश्व निर्माण करतो. 'त्रिशूल-२' मध्ये विजयचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. पुढे त्यांनी सांगितलं, जर 'त्रिशूल- २' बनवला गेला तर अमिताभ बच्चन आणि अशोक पंडित पाचव्यांदा एकत्र काम करताना दिसतील".

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना गोड सरप्राइज मिळालं आहे. याचं कारण १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'त्रिशूल' सिनेमाचा सीक्वल येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'बिग बीं'नी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 'सात हिंदुस्तानी' नंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली. 'भुवन शोम', 'आनंद', 'प्यार की कहानी', 'परवाना' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. परंतु, बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट फारसे चालले नाही. १९७३ मध्ये आलेल्या 'शहंशाह' सिनेमाने अमिताभ बच्चन यांच्या करिअरला कलाटणी मिळाली.

Web Title: bollywood actor amitabh bachchan birthday trishul movie sequel announcement after 46 years by anand pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.