अमिताभ बच्चन यांचा 'तो' निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं; वॉचमनचा पगारही द्यायला नव्हते पैसे, असं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:03 PM2024-09-24T15:03:27+5:302024-09-24T15:08:35+5:30

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जातात.

bollywood actor amitabh bachchan unknown story had no no money to pay watchman know about struggle | अमिताभ बच्चन यांचा 'तो' निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं; वॉचमनचा पगारही द्यायला नव्हते पैसे, असं काय घडलेलं?

अमिताभ बच्चन यांचा 'तो' निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं; वॉचमनचा पगारही द्यायला नव्हते पैसे, असं काय घडलेलं?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जातात. हिंदी सिनेविश्वात जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. पण, त्यांच्या या प्रवासात 'बिग बीं'नी असंख्य अडणींचा सामना केला. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्याकडे वॉचमनचा पगार द्यायलाही पैसे नव्हते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. अनेकजण त्यांची अशी अवस्था पाहून हसले देखील होते. केवळ  चुकीच्या निर्णयामुळे त्यांना ते वाईट दिवस पाहावे लागले होते. तरीही हार न मानता 'बिग बीं'नी संकाटाशी दोन हात करत गमावलेलं वैभव पुन्हा उभं केलं. 


अलिकडेच 'वेट्टैयान' या चित्रपटाच्या लॉन्चिंग दरम्यान अमिताभ बच्चन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जोडले गेले होते.  त्यादरम्यान अभिनेते रजनीकांत देखील उपस्थित होते. त्यादरम्यान रजनीकांत यांनी १९९० च्या काळातील अमिताभ बच्चन यांच्यावर ओढावलेल्या त्या परिस्थितीचा उल्लेख केला. त्यावेळेस रजनीकांत देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यादरम्यान रजनीकांत म्हणाले, "बिग बींनी तेव्हा व्यवसाय क्षेत्रात नशीब अमावण्याचं ठरवलं आणि स्वत: च्या मालकिची एक कंपनी त्यांनी सुरू केली. 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' असं त्या कंपनीचं नाव होतं. पण, कालांतराने कंपनी डबघाईला आली आणि 'बिग बीं'चं मोठं नुकसान झालं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. असं असलं तरी अमिताभ बच्चन यांनी हार मानली नाही". 

पुढे रजनीकांत म्हणाले, "बिग बीं'ना तेव्हा सर्वात मोठा फटका ज्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. पण, आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सगळं वैभव पुन्हा उभं केलं. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी कंपनी वाचवण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला. त्यामुळे त्यांना प्रचंड तोटा झाला होता. इतकंच नाही तर त्यांनी जुहू येथील राहत्या घराता लिलाव देखाल होणार होता. तरीही ते डगमगले नाहीत. अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. अखेरीस अमिताभ यांनी संकटाला मात दिली". सध्याच्या घडीला अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ १५७८ कोटी इतकी असल्याचं सांगितलं जातं.

Web Title: bollywood actor amitabh bachchan unknown story had no no money to pay watchman know about struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.