'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:16 AM2024-05-20T11:16:38+5:302024-05-20T11:17:38+5:30
दोन्ही हातांना आधार घेत हळूहळू चालत ते मतदान केंद्रावर पोहोचले.
आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. नागरिक सकाळी लवकर घरातून बाहेर पडत मतदानासाठी पोहचत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटीही रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावत आहेत. अक्षय कुमार, फरहान अख्तर, जान्हवी कपूरसह काही सेलिब्रिटींचे व्हिडिओ व्हायरल झाले. आता ७० च्या दशकातील हँडसम हिरो धर्मेंद्रही (Dharmendra) मतदान केंद्रावर पोहोचले आहेत.
धर्मेंद्र यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला आहे. दोन्ही हातांना आधार घेत हळूहळू चालत ते मतदान केंद्रावर पोहोचले. चेक्स शर्ट, पँट आणि डोक्यावर राऊंड कॅप या लूकमध्ये ते आले. त्यांनी हसत हसतच सर्वांना अभिवादन केलं. मतदान केंद्राच्या बाहेर येत त्यांनी बोटावरील शाई दाखवत कॅमेऱ्यासमोर पोज दिली. यानंतर नमस्कार करत ते तिथून निघाले.
#WATCH | Veteran actor Dharmendra casts his vote at a polling booth in Mumbai.#LokSabhaElections2024pic.twitter.com/FqXmZ5jFPG
— ANI (@ANI) May 20, 2024
तर दुसरीकडे अभिनेत्री हेमा मालिनी लेक ईशा देओलसह मतदान केंद्रावर दाखल झाल्या. हेमा मालिनी स्वत: विद्यमान खासदार असून याहीवर्षी त्या मथुरेतून निवडणूकीसाठी उभ्या आहेत. यंदाही त्या निवडून येतात का हे 4 जूनलाच स्पष्ट होईल. हेमा मालिनी यांच्यासाठी त्यांच्या दोन्ही लेकींनीही जोरदार प्रचार केला.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Actress and MP Hema Malini, her daughter and actress Esha Deol cast their votes at a polling booth in Mumbai #LokSabhaElections2024pic.twitter.com/qeLlf0GyRa
— ANI (@ANI) May 20, 2024
आतापर्यंत धर्मेंद्र, हेमामालिनी, ईशा देओल यांच्याशिवाय अक्षय कुमार, तबू, जान्हवी कपूर, फरहान अख्तर, झोया अख्तर, सुभाष घई, शाहीद कपूर यांनीही मतदान केलं आहे.