'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:38 PM2024-10-10T13:38:00+5:302024-10-10T13:38:33+5:30

रतन टाटांचं निधन झाल्यामुळे धर्मंद्र यांची भावुक पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

bollywood actor Dharmendra emotional post on ratan tata death | 'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

काल संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला मोठा धक्का बसला. भारतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वातील एक कोहिनूर गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. रतन टाटांनी कायमच सामान्य माणसाचा विचार करुन स्वप्न बघण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं. अशातच रतन टाटांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची शोकाकुल पोस्ट लिहिली आहे. 

धर्मेंद्र यांची रतन टाटांविषयी भावुक पोस्ट

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची रतन टाटांविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे. धर्मेंद्र यांनी रतन टाटांचा फोटो पोस्ट करुन त्याखाली कॅप्शन लिहिलंय की, "रतन टाटा साहेब, तुम्हाला भेटायची इच्छा अपूर्णच राहिली. आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळणारा एक विनम्र राजा. कायम खूप प्रेमाने आणि सन्मानाने आम्ही तुमची आठवण काढू." अशी पोस्ट लिहून धर्मेंद्र यांनी रतन टाटांविषयी खास पोस्ट लिहिली आहे.


रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न मिळणार?

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावर आज दुपारी वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी विविध स्तरावरुन होत आहे. आता राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: bollywood actor Dharmendra emotional post on ratan tata death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.