वयाच्या 86 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी रिक्रिएट केला 'शोले'तील सीन?; पाहा वीरुचं 'चक्की पीसिंग'चं नवीन व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 12:50 PM2021-12-29T12:50:09+5:302021-12-29T12:50:52+5:30

Dharmendra: कलाविश्वापासून दूर झालेले धर्मेंद्र त्यांचा सर्वाधिक वेळ शेती करण्यात घालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या शेतात अनेक भाज्या, धान्य यांची लागवड केली आहे.

bollywood actor dharmendra grinding wheat with workout watch video | वयाच्या 86 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी रिक्रिएट केला 'शोले'तील सीन?; पाहा वीरुचं 'चक्की पीसिंग'चं नवीन व्हर्जन

वयाच्या 86 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी रिक्रिएट केला 'शोले'तील सीन?; पाहा वीरुचं 'चक्की पीसिंग'चं नवीन व्हर्जन

googlenewsNext

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर एकेकाळी संपूर्ण कलाविश्व दणाणून सोडणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र (Dharmendra) . या दिग्गज अभिनेत्यांने त्यांच्या करिअरच्या काळात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं. सध्या धर्मेंद्र कलाविश्वापासून दूर आहेत. मात्र, सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा ते त्यांच्या शेतातील किंवा फार्म हाऊसमधील फोटो, व्हिडीओ शेअर करत त्यांच्या जीवनातील लहानमोठे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी गहू दळतांनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांना शोले चित्रपटातील एक फेमस डायलॉगदेखील आठवल्याचं त्यांनी सांगितलं.

कलाविश्वापासून दूर झालेले धर्मेंद्र त्यांचा सर्वाधिक वेळ शेती करण्यात घालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या शेतात अनेक भाज्या, धान्य यांची लागवड केली आहे. याचे अपडेट्सही त्यांनी नेटकऱ्यांना दिले आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षीही ते मोठ्या हरहुन्नरी शेतातील प्रत्येक काम करत असल्याचं पाहायला मिळतं. यात त्यांनी अलिकडेच गहू दळतांनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र सायकलिंग करतांना दिसत आहेत. या सायकलिंगच्या माध्यमातून ते गहू दळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. "सायकलिंग, सायकलिंग, सायकलिंग आणि चक्की पिसिंग..अँड पिसिंग...अँड पिसिंग..हाहा", असं कॅप्शन देत त्यांनी 'शोले' चित्रपटातील 'चक्की पिसिंग' या फेमस डायलॉगची प्रेक्षकांना आठवण करुन दिली आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ८६ वर्षांचे ओल्ड यंग बॉय...ये है गरम धरम, असं एका युजरने म्हटलं आहे. तर तुम्ही फार डाऊन टू अर्थ आहात. देव तुम्हाला दिर्घायुष्य देवो, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

Web Title: bollywood actor dharmendra grinding wheat with workout watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.