"इतके पैसे आले कुठून?"; घर बांधल्यानंतर खोचक प्रश्न विचारणाऱ्यांना इमरानचं उत्तर, म्हणाला, मी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:44 PM2024-06-03T12:44:58+5:302024-06-03T12:45:24+5:30
Imran khan: नुकतंच इमरानने एका डोंगराळ भागात त्याचं नवीन घर बांधलं आहे. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आला. तो म्हणजे इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या इमरानकडे घर बांधायला पैसे आले कुठून?
'जाने तू या जाने' ना या सिनेमाच्या माध्यमातून रातोरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे इमरान खान (Imran khan) . स्मार्ट पर्सनालिटी आणि अभिनयाच्या जोरावर इमरान लोकप्रिय झाला. परंतु, अचानक तो इंडस्ट्रीमधून बाहेर गेला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तो इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र, सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. नुकतंच इमरानने एका डोंगराळ भागात त्याचं नवीन घर बांधलं आहे. या घराचे काही फोटो त्याने सोशल मीडियावरा पोस्ट करत त्याच्या घराविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्याची ही पोस्ट पाहिल्यावर काही युजरने त्याला खोचक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यात घर बांधण्यासाठी पैसे कुठून आले? असं विचारणाऱ्या युजरला त्याने सडेतोड उत्त दिलं आहे.
इमरान गेल्या कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचं साधन काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातच त्याने आलिशान घर बांधल्यामुळे त्याने घर बांधायला एवढी मोठी रक्कम कुठून उभी केली हा प्रश्नही नेटकऱ्यांना पडतोच. त्यामुळे एका युजरने त्याला थेट प्रश्न विचारला.
ट्रोलरने विचारला खोचक प्रश्न
"जो अभिनेता वर्षानुवर्षे काम करत नव्हता, त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले, असं एकाने विचारलं. तर ''घर बांधायलातुला पैसे कुठून मिळाले?", "हा माणूस आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी अंडरग्राउंड होता," अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
इमरानने दिलं ट्रोलर्सला उत्तर
"२००० सलाच्या मध्यामध्ये मी काही सिनेमांमध्ये काम केलं आहे", असं उत्तर इमरानने या ट्रोलर्सला दिलं. त्यामुळे सिनेमातून कमावलेल्या पैशातूनच त्याने हे घर उभारल्याचं इमरानने स्पष्ट केलं आहे. इमरानने दिलेल्या या उत्तरामुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, इमरानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या घराची माहिती दिली. सोबतच घराचे १० फोटोदेखील शेअर केले. “मागच्या काही वर्षांमध्ये मी जी काही काम केलं त्यातलंच एक काम म्हणजे घर बांधणं. काही चित्रपटांमध्ये मी आर्किटेक्चरची भूमिका केली होती, पण खऱ्या आयुष्यात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तज्ज्ञ असल्याचा दिखावा आपण करू शकत नाही. पण मला गोष्टी शिकण्यात व करण्यात मजा वाटते. मी वर्षातला पहिला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला. पाऊस पडल्यावर धबधबे पाहण्यासाठी व वेगेवगेळ्या ऋतूंमध्ये बदलणारी झाडांची पानं पाहण्यासाठी प्रत्येक वेळी इथे आलो. माझ्या कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरशी बोलून मी काँक्रीट स्लॅबऐवजी आजूबाजूच्या गावांमध्ये घरं बांधण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो. त्या पद्धतीचा वापर केला आहे, असं इमरानने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.