हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:46 IST2025-04-22T15:46:03+5:302025-04-22T15:46:37+5:30

हॉटेलमध्ये अनलिमिटेड ऑफरमध्ये बॉलिवूड अभिनेत्याने ६४ चपात्या खाऊन सर्वांनाच थक्क करुन सोडलं. कोण आहे हा अभिनेता?

Bollywood actor john abraham eats 64 rotis after hearing unlimited offer at hotel | हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला

हॉटेलमध्ये 'अनलिमिटेड' ऑफर ऐकताच बॉलिवूड अभिनेत्याने खाल्ल्या तब्बल ६४ चपात्या, वेटर पाहतच राहिला

तुम्ही एका समजा एका हॉटेलमध्ये गेलात आणि तिथे अनलिमिटेड फूडची ऑफर वाचली तर तुमची भूक नकळत आणखी वाढते. त्यामुळे तुम्ही त्या हॉटेलमधील जेवणावर मनसोक्त ताव मारता. पण तुम्ही जास्तीत जास्त किती खाल? हा किस्सा एका बॉलिवूड अभिनेत्याचा. जेव्हा अनलिमिटेडची ऑफर बघताच या अभिनेत्याने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ६४ चपात्या खाल्ल्या. कोण होता हा अभिनेता? वाचा हा धमाल किस्सा

या अभिनेत्याने अनलिमिटेड ऑफरचा घेतला पुरेपूर फायदा

हा किस्सा घडला होता अभिनेता जॉन अब्राहमसोबत. २०२२ मध्ये जॉन आपल्या 'अटॅक: पार्ट 1' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये आला होता. यावेळी त्याने कॉलेजमध्ये असताना त्याच्या खाण्याच्या सवयी कशा होता त्याविषयी एक मजेशीर आठवण सांगितली. झालं असं की, एका फुटबॉल सामन्यानंतर गुजराती थाळी रेस्टॉरंटमध्ये जॉन जेवायला गेला होता. त्या हॉटेलमध्ये अनलिमिटेड जेवण दिले जाते. त्यावेळी जॉनने तब्बल ६४ चपात्या खाल्ल्या. चपात्या आकाराने छोट्या असल्याने जॉनने एकामागून एक पटापट चपात्या संपवल्या. 

जॉनला असं खाताना बघून वेटरही हैराण झाला. तो जॉनला म्हणाला, "अजून भातही आहे, तोही घ्या!".  हे ऐकताच जॉनने नंतर भातही खाल्ला. अशाप्रकारे अनलिमिटेड ऑफरचा जॉनने मनसोक्त फायदा घेतला. जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, २०२५ मध्ये जॉनची भूमिका असलेला 'द डिप्लोमॅट' हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज  झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय जॉन सध्या पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या आयुष्यावरील आगामी बायोपिक सिनेमात अभिनय करत आहे. रोहित शेट्टी या बायोपिकचं दिग्दर्शन करत आहे.

Web Title: Bollywood actor john abraham eats 64 rotis after hearing unlimited offer at hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.