गणपती बाप्पा मोरया! 'भूल भुल्लैया-३' च्या यशासाठी अभिनेता कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:41 PM2024-11-01T16:41:45+5:302024-11-01T16:46:23+5:30

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'भूल भुलैल्या-३' नुकताच प्रदर्शित झाला आहे.

bollywood actor kartik aaryan reach siddhivinayak temple to seek blessings of ganpati bappa for bhool bhulaiyaa 3 movie | गणपती बाप्पा मोरया! 'भूल भुल्लैया-३' च्या यशासाठी अभिनेता कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

गणपती बाप्पा मोरया! 'भूल भुल्लैया-३' च्या यशासाठी अभिनेता कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन

Bhool Bhulaiyaa 3 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) बहुप्रतीक्षित चित्रपट 'भूल भुलैल्या-३' (Bhool Bhulaiyaa 3) नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या शुभ मुहू्र्तावर १ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्याने बाप्पाकडे साकडं घातलं आहे. चित्रपट रिलीज होताच कार्तिक आर्यन सिद्धीविनायकाच्या चरणी लीन झाला आहे. चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्याने गणरायाकडे प्रार्थना करताना दिसतोय.


'भूल भुलैल्या-३' चित्रपट पडद्यावर येताच प्रेक्षकांसहीत सेलिब्रिटींनाही चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्याने त्याच्याकामातून वेळ काढत बाप्पाचा आशीर्वाद घेण्यास पोहोचला आहे. त्यावेळी अभिनेत्याने दोन्ही हात जोडून सिद्धीविनायकच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळतोय. "Thank you Bappa for My biggest Friday" असं कॅप्शन देत अभिनेत्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

'भूल भुलैल्या-३' प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित, विद्या बालन,तृप्ती डिमरी, राजपाल यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतेय. जवळपास १५० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर चालणार की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 

Web Title: bollywood actor kartik aaryan reach siddhivinayak temple to seek blessings of ganpati bappa for bhool bhulaiyaa 3 movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.