'मुंज्या' फेम अभिनेत्याला मुंबईत आला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाला- "त्या घटनेनंतर मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 02:06 PM2024-10-04T14:06:07+5:302024-10-04T14:09:43+5:30

बॉलिवूड अभिनेता अभय वर्माने एका मुलाखतीत मुंबईत त्याला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितलं आहे.

bollywood actor munjya fame abhay verma revealed in interview about casting couch experience in industry | 'मुंज्या' फेम अभिनेत्याला मुंबईत आला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाला- "त्या घटनेनंतर मी..."

'मुंज्या' फेम अभिनेत्याला मुंबईत आला कास्टिंग काऊचचा अनुभव; म्हणाला- "त्या घटनेनंतर मी..."

Abhay Verma : 'मुंज्या' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. अभिनेत्री शर्वरी वाघ तसेच अभय वर्मा यांची चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अशातच अलिकडेच अभिनेता अभय वर्माने एका मुलाखीत कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. 


इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर भाष्य केलं. मुलाखती दरम्यान अभिनेता म्हणाला, "मी माझ्या  करिअरमध्ये कधीच कोणाला नकार दिला नव्हता. खरंतर झालं असं की मी मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा मला वाईट अनुभव आला. लोकांना त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे असतात. त्यावेळी मी माझ्या तत्वांवर ठाम राहिलो आणि परत हरियाणाची वाट धरली". 

पुढे अभिनेता म्हणाला, "तेव्हा मला ती गोष्ट समजलीच नव्हती. त्यानंतर मी स्वत: लाच म्हणालो की माझ्या आयुष्यातील निर्णय घेण्याचा अधिकार मी इतरांना का देऊ? या घटनेनंतर मी माझ्या मुळगावी हरियाणाला गेलो. तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो. त्यानंतर मी मनाशी निश्चय केला आणि मुंबईत पुन्हा यायचं ठरवलं. हा माझा प्रवास आहे कोणालाही त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही". असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला. 

वर्कफ्रंट-

अभय वर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने  २०१९ मध्ये 'लिटिल थिंग्स' या वेब सीरिजच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर वेगवेगळ्या टीव्ही जाहिरातींमध्येही तो झळकला आहे. 

Web Title: bollywood actor munjya fame abhay verma revealed in interview about casting couch experience in industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.