नाना पाटेकर यांच्या नवीन बॉलिवूड सिनेमाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घोषणा; या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 05:45 PM2024-10-12T17:45:21+5:302024-10-12T17:53:20+5:30

'गदर एक प्रेमकथा' आणि 'गदर-२' यांसारखे एकापेक्षा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

bollywood actor nana patekar seen in upcoming movie vanvaas director anil sharma announcement on dussehra | नाना पाटेकर यांच्या नवीन बॉलिवूड सिनेमाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घोषणा; या दिवशी होणार रिलीज

नाना पाटेकर यांच्या नवीन बॉलिवूड सिनेमाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घोषणा; या दिवशी होणार रिलीज

Nana Patekar Upcoming Movie : 'गदर एक प्रेमकथा' आणि 'गदर-२' यांसारखे एकापेक्षा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  'वनवास' असं या चित्रपटाचं नाव आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.  अभिनेते नाना पाटेकर देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 


सोशल मीडियावर अनिल शर्मा यांच्या 'वनवास' या आगामी चित्रपटाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.चित्रपटात नाना पाटेकर, खुशबू सुंद, राजपाल यादव, ,सिमरत कौर यांसारखी तगडी स्टारकास्ट असणार आहे. 'कहानी जिंदगी की, कहानी जज्बात की. कहानी अपनों के विश्वास की' या थीमवर चित्रपट आधारित असल्याचं सांगण्यात येतंय. झी स्टुडिओने इन्स्टग्रामवर व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांनी माहिती दिली आहे. परंतु अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आलेली नाही.

अनिल शर्मा यांनी लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. झी स्टुडिओ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करणार आहे.अनिल शर्मा यांनी 'गदर: एक प्रेम कथा', 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'अपना' आणि 'गदर-२' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.  

Web Title: bollywood actor nana patekar seen in upcoming movie vanvaas director anil sharma announcement on dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.