सलमानचा 'तो' ब्लॉकबस्टर चित्रपट; आजही आहे चाहत्यांमध्ये क्रेझ, फिल्मी करिअरसाठी ठरला वरदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:31 PM2024-09-19T15:31:51+5:302024-09-19T15:38:38+5:30

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता अशी ओळख सलमान खानने जगभरात निर्माण केली आहे.

bollywood actor salman khan and ayesha takia wanted movie completed 15 years | सलमानचा 'तो' ब्लॉकबस्टर चित्रपट; आजही आहे चाहत्यांमध्ये क्रेझ, फिल्मी करिअरसाठी ठरला वरदान 

सलमानचा 'तो' ब्लॉकबस्टर चित्रपट; आजही आहे चाहत्यांमध्ये क्रेझ, फिल्मी करिअरसाठी ठरला वरदान 

Salman Khan Wanted Movie Success : बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता अशी ओळख सलमान खानने जगभरात निर्माण केली आहे. २००० ते २००८ या कालावधीत सलमानचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण, तरीही हार न मानता अभिनेत्याने 'वॉन्टेड' चित्रपटातून जोरदार कमबॅक केलं.


सलमान खान आणि आएशा टाकिया यांचा 'वॉन्टेड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १५ वर्षे उलटली आहेत. 'वॉन्टेड'ने खऱ्या अर्थान सलमानचं करिअर सावरलं, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

सलमान खान मुख्य भूमिकेत असलेला 'वॉन्टेड' सिनेमा २००९ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. अभिनेत्री आएशा टाकिया तसेच महेश मांजरेकर यांसारखी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळाली. चित्रपटात सलमान खानने साकारलेलं 'राधे' नावाचं पात्रं चाहत्यांना प्रचंड आवडलं. 'एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपनी आप की भी नहीं सुनता... 'हा डायलॉग त्यावेळी प्रत्येकाच्या ओठावर असायचा. 

'वॉन्टेड'ला १५ वर्षे पूर्ण-

'वॉन्टेड' सिनेमाचं बॅकग्राउंड म्यूझिक त्यातील गाणी देखील तेव्हा हिट झाली. 'जलवा' ,'लव मी लव मी' या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेड लावलं. त्यासोबतच 'वॉन्टेड' सलमानच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. एकामागोमाग फ्लॉप चित्रपटानंतर या सिनेमाने सलमानचं करिअर सावरलं. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, वॉन्टेड चित्रपटाने जगभरात ८७.४४ कोटी इतकी कमाई केली होती. 

Web Title: bollywood actor salman khan and ayesha takia wanted movie completed 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.