फक्त १ रुपया मानधन, HIV बाधित रुग्णाची भूमिका; सलमानच्या 'या' चित्रपटासाठी बॉलिवूडने दिलेला नकार; काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 03:30 PM2024-09-12T15:30:14+5:302024-09-12T15:32:00+5:30
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जगभर चाहते आहेत.
Salman Khan Charge One Rupees For Movie: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जगभर चाहते आहेत. आपल्या दमदार अभिनयाने सलमान खाननेबॉलिवूडवर आपला दबदबा निर्माण केला. अभिनेता त्याच्या अभिनयाबरोबरच दिलदारपणामुळे देखील चर्चेत येत असतो. जवळपास तीन दशकं त्यांने हिंदी सिने-इंडस्ट्री गाजवली. सलमानने त्याच्या अभिनय कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये असे देखील चित्रपट आहेत जे त्याच्या अक्टिंगमुळे नाहीतर त्याच्या स्वभावामुळे चर्चेत आले.
'फिर मिलेंगे' या हिंदी चित्रपटामध्ये सलमान खानने एका एचआयव्ही बाधित रुग्णाची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी सलमाने फक्त १ रुपया इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.
फिर मिलेंगे' या सिनेमाचे दिग्दर्शक शेलैंद्र सिंग यांनी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. "फिर मिलेंगे' मध्ये एका एचआयव्ही बाधित रुग्णाची भूमिका साकारण्यास बऱ्याच कलाकारांनी नकार दिला होता. एक सलमान खान असा अभिनेता होता ज्याने ती व्यक्तिरेखा साकारण्यास होकार दर्शवला. या चित्रपटामध्ये दबंग खान शिल्पा शेट्टीच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला. असा रोल निभावल्याने आपल्या स्टारडमवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज असतानाही त्याने या चित्रपटात काम केलं".
चित्रपटासाठी घेतलं फक्त १ रुपयाचं मानधन-
शेलैंद्र सिंग पुढे म्हणाले," सलमान या चित्रपटात काम करण्यास तयार झाला. इतका मोठा स्टार असूनही त्याने या सिनेमासाठी एक रुपयाचं मानधन घेतलं". एचआयव्ही ची लागण होऊन त्या पात्राचा मृत्यू होतो असं या चित्रपटाचं कथानक आहे.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो रश्मिका मंदानासोबत स्क्रिन शेअर करेल. ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. तसेच अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'मध्येदेखील सलमानचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे, पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.