Salman Khan Hotel: सलमान मुंबईत सुरू करतोय १९ मजली आलिशान हॉटेल, सी फेसिंग प्राइम लोकेशन; प्रॉपर्टीची मालकीण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 02:57 PM2023-05-20T14:57:34+5:302023-05-20T14:59:06+5:30

पाहा कुठे सुरू होणारे सलमानचं नवं हॉटेल.

bollywood actor Salman Khan s 19 storey luxury hotel in Mumbai sea facing prime location Who owns the property know details | Salman Khan Hotel: सलमान मुंबईत सुरू करतोय १९ मजली आलिशान हॉटेल, सी फेसिंग प्राइम लोकेशन; प्रॉपर्टीची मालकीण कोण?

Salman Khan Hotel: सलमान मुंबईत सुरू करतोय १९ मजली आलिशान हॉटेल, सी फेसिंग प्राइम लोकेशन; प्रॉपर्टीची मालकीण कोण?

googlenewsNext

अलीकडेच सलमान खान 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकला नाही. दरम्यान, आता सलमान खान आणि त्याचे कुटुंब सी-फेसिंग हॉटेल उघडण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. सलमान खाननं एक मालमत्ता खरेदी केली आहे, ज्याठिकाणी तो आता एक आलिशान हॉटेल सुरू करण्याच्या तयारीत आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सलमान खान कार्टर रोड, वांद्रे येथे हे आलिशान हॉटेल उघडण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार तो लवकरच रिनोवेशनचं काम सुरू करून हे हॉटेल खुलं करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्ट्सनुसार, ही इमारत १९ मजली आहे. तसंच याला मुंबई महानगरपालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. सलमान खान आणि त्याच्या भावांनी या इमारतीत आधी स्वतःसाठी अपार्टमेंट खरेदी केले होते. सुरुवातीला रेसिडेन्शीअल प्रॉपर्टी म्हणून त्याचं रिनोवेशन करण्याची त्यांची योजना होती. मात्र, नंतर त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला. या इमारतीला हॉटेल बनवण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीचा आहे, ज्यामध्ये सलमान खानची आई सलमा खान यांचे नाव आहे. त्या या मालमत्तेची मालक आहेत.

असं आहे प्लॅनिंग

सलमान खानचे आर्किटेक्ट सप्रे अँड असोसिएट्स यांनी न्यू डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन (DCPR 2034) अंतर्गत सेंट्रल एअर कंडिशन आणि व्यावसायिक वापर म्हणून या इमारतीसाठी अर्ज केला आहे. या इमारतीत तीन तळघरं आहेत. नवीन प्लॅननुसार पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू करता येतील. यासोबतच तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असणार आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सर्व्हिसेस, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्याची योजना आहे. तर सातव्या ते १९व्या मजल्याचा वापर हॉटेलसाठी केला जाणार आहे.

Web Title: bollywood actor Salman Khan s 19 storey luxury hotel in Mumbai sea facing prime location Who owns the property know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.