शाहिद कपूरने वरळीतील ६० कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:16 AM2024-11-13T10:16:18+5:302024-11-13T10:20:44+5:30

शाहिद कपूरने मोठा आर्थिक व्यवहार केला आहे. अभिनेत्याने त्याचं वरळीतील घर भाड्यानं दिलं आहे. 

bollywood actor shahid kapoor rents out his luxury apartment in worli for 20 lakh per month in next 5 years | शाहिद कपूरने वरळीतील ६० कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये

शाहिद कपूरने वरळीतील ६० कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये

Shahid Kapoor: शाहिद कपूर (Shahid Kapoor) बॉलिवूडमधील  नावाजलेला अभिनेता आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. त्यामुळे त्याच्याबाबतीत जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. सध्या अभिनेता त्याने केलेल्या एका व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. नुकताच अभिनेत्याने त्याचा वरळीतील लग्झरी अपार्टंमेंट भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबईतील वरळी स्थित असलेलं घर शाहिदने पुढील पाच वर्षांच्या करारावर भाडेतत्वावर दिलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद आणि मीरा राजपुत यांनी या घरासाठी ५८.६ कोटी मोजले होते. अलीकडेच २०२४ मध्येच त्यांनी हे घर खरेदी केलं होतं. आता त्याने हे घर भाड्याने दिल्याचं सांगितलं जातंय. जवळपास या घराचं एका महिन्याचं भाडं २० लाख रुपये इतकं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याने त्याचं घर डेकोर होम फॅब्रिक्सचे सिनिअर एक्झिक्यूटिव्ह दीपक भुगतान यांना भाड्याने दिलंय. 

शाहिद कपूरच्या या घराचं एकुण क्षेत्रफळ ५,३९५ चौरस फूट आहे. तर या घराचा कॉर्पोरेट एरिया ५७३.७८ स्क्वेअर फूट इतका आहे. शिवाय तीन कार पार्किंग स्पेसची सुविधाही देण्यात आली आहे. यासाठी १ कोटी २३ लाखांचं डिपॉझिटही देण्यात आलंय. परंतु शाहिद कपूरने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. 

शाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोशन एंड्डु या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. येत्या २०२५ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येईल.

Web Title: bollywood actor shahid kapoor rents out his luxury apartment in worli for 20 lakh per month in next 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.