ओटीपी शेअर न करता या बॉलिवूड अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक;वाचा नेमकं काय घडल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 07:10 PM2022-10-22T19:10:29+5:302022-10-22T19:11:37+5:30

सध्या ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यामुळे अनेकांचा वेळ वाचतो. यात फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Bollywood actress aasttha sidanawas cheated of lakhs without sharing OTP | ओटीपी शेअर न करता या बॉलिवूड अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक;वाचा नेमकं काय घडल?

ओटीपी शेअर न करता या बॉलिवूड अभिनेत्रीची लाखोंची फसवणूक;वाचा नेमकं काय घडल?

googlenewsNext

सध्या ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यामुळे अनेकांचा वेळ वाचतो. यात फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सर्वासामान्यांच्या फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत, पण आता बॉलिवूड अभनेते आणि अभिनेत्यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आता नुकतेच एका अभिनेत्रीची फसवणूक झाली असल्याची तक्रार दाखल झाली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिडाना सायबरची शिकार झाली आहे. सायबर चोरांनी कोणताही ओटीपी क्रमांक शेअर न करता तिच्या बँक खात्यातून दीड लाखांहून अधिक रक्कम चोरली. या प्रकरणी आस्थाने पोलिसांत तक्रार दिली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना बुधवारी घडली. आस्था सिदाना या एसएमएस फसवणुकीच्या बळी ठरली. काही वेळाने आस्थाच्या लक्षात आले की तिला आलेला मेसेज चुकीच्या उद्देशाने पाठवण्यात आला होता आणि त्यामुळे आस्थाने ओटीपी शेअर करणे टाळले. मात्र तरीही तिच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत.

 

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला दिलासा! अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी २५ वर्षीय अभिनेत्री आस्था सिडाना यांना एक एसएमएस आला. या मेसेजमध्ये केवायसी भरण्याची लिंक देण्यात आली होती. ही प्रक्रिया न केल्यास ई-वॉलेट निष्क्रिय केले जाईल, असे यात लिहिले होते. सध्या बहुतांश लोक गुगल पे, पेटीएम किंवा डिजिटल व्यवहार करतात. त्यामुळे आस्थाने ई-वॉलेट सेवा बंद होऊ नये म्हणून तिने लिंकवर क्लिक केले, ही तिची सर्वात मोठी चूक होती.

या प्रकरणी खार पोलिसांनी आस्थाच्या तक्रारीची नोंद केली आहे. आस्थाचे बँक खाते सध्यातरी गोठवण्यात आले आहे. सायबर गुन्हेगारांनी त्याच्या खात्यातून १ लाख ६० हजार रुपये काढले आहेत. तीन महिन्यांपूर्वी दिल्लीहून मुंबईत आलेल्या आस्थाला सायबर गुन्हेगारांनी गंडा घातला, तिला एसएमएसद्वारे बनावट लिंक पाठवण्यात आली. आस्थाने त्या लिंकवर क्लिक केले. या लिंकवर त्यांनी त्यांचा इंटरनेट बँकिंग पिन टाकल्याचे खार पोलिसांनी सांगितले. त्यामुळे तिचे पैसे ऑनलाईन गेले. 

Web Title: Bollywood actress aasttha sidanawas cheated of lakhs without sharing OTP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.