प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; खरोखरच आई होणार आहे का अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:42 PM2023-10-02T14:42:57+5:302023-10-02T14:51:05+5:30
अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान विराट कोहलीही गुवाहाटीवरुन वर्ल्ड कपचा सराव सोडून अचानक मुंबईत आल्याचंही वृत्त होतं. अशातच अनुष्काचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का शर्मा पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसऱ्या प्रेग्नन्सीमुळे अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान विराट कोहलीही गुवाहाटीवरुन वर्ल्ड कपचा सराव सोडून अचानक मुंबईत आल्याचंही वृत्त होतं. अशातच अनुष्काचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चेदरम्यानच अनुष्का कॅमेरासमोर आल्याचं दिसलं. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन अनुष्काचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अनुष्का गाडीतून जात असल्याचं दिसत आहे. पापाराझींना बघून अनुष्काने हॅलो केल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. आता अनुष्का खरंच दुसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
"शाहरुखच्या टीमने माझ्यावर हल्ला केला", विवेक अग्निहोत्रींचे किंग खानवर गंभीर आरोप
विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगची प्रचंड चर्चा रंगली होती. लग्नानंतर चार वर्षांनी २०२१मध्ये अनुष्काने गोंडस मुलीला जन्म दिला. वामिका असं विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव आहे. आता पुन्हा ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.