फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:30 PM2024-09-18T15:30:38+5:302024-09-18T15:35:37+5:30

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो-२' सध्या सध्या चर्चेत येत आहे.

bollywood actress archana puran singh revealed in interview about her fees in great indian kapil show | फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन 

फक्त हसून अर्चना पूरण सिंह कमावते इतके पैसे; 'कपिल शर्मा शो'साठी अभिनेत्री घेते तगडे मानधन 

Archana Puran Singh : प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो-२' सध्या चर्चेत येत आहे.  लवकरच त्याचा हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे या शो विषयी अनेक अपडेट समोर येत आहेत. यामध्येच आता प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांनी शो विषयी एक मोठा खुलासा केला आहे. या शोसाठी अर्चना पूरण सिंहला खुर्चीवर बसून हसण्याचे किती मानधन घेतात, याबाबत त्यांनी सांगितलं आहे. 


'द ग्रेट इंडियन कपिल शो-२' चा दुसऱ्या सीझनपूर्वी कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम कार्यक्रमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान, अभिनेत्री अर्चना पूरण सिंहसह इतर कलाकारांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यादरम्यान, अर्चना पुरण सिंह यांनी त्यांना मिळणारं मानधन आणि इतर कलाकारांना मिळणारं मानधन याबाबत अनेक खुलासे केले आहेत. 'कपिल शर्मा शो' हा त्यातील कलाकारांच्या विनोदी शैलीबरोबरच अर्चना यांच्या हसण्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांची आता कपल शर्मा शोच्या परिक्षक म्हणून ओळख बनली आहे. 

नुकतीच अभिनेत्रीने सिध्दार्थ कनन यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी असंख्य गोष्टींवर प्रकाश टाकला. मुलाखतीत किकू शारदा यांना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर उत्तर देताना अर्चना म्हणाल्या, "हे लोक माझ्यापेक्षा दुप्पट पैसे घेऊन जातात. कारण ते मेहनत करतात. मला फक्त हसण्याचे पैसे मिळतात आणि त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी मिळतात. काही लोकांना त्यांच्या सुंदरतेमुळे पैसे मिळतात तर काहींना त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे. पण, मला या सर्व गोष्टींसाठी पैसे देण्यात येतात". अशा मिश्किल पद्धतीने त्यांनी मुलाखतीत उत्तर दिलं. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो-२' शोमध्ये कपिलसोबत कृष्णा अभिषेक, किकू शारदा, अर्चना पूरन सिंह आणि राजीव ठाकूर हे देखील दिसत आहेत. या शोचा प्रीमियर नेटफ्लिक्सवर होणार आहे. सध्या त्याची रिलीज डेट समोर आलेली नाही. पहिल्या सीझनमध्ये क्रिकेट, संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातील बड्या व्यक्तींनी भाग घेतला होता. शोमध्ये आमिर खान, नीतू कपूर, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सारखे मोठे स्टार्स दिसले. कपिलच्या शोमध्ये यापूर्व कधीही न दिसणारा आमिर, शोमध्ये सहभागी झाला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: bollywood actress archana puran singh revealed in interview about her fees in great indian kapil show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.