प्रसिद्ध घराण्याची सून होताच उद्ध्वस्त झालं करिअर! फ्लॉप सिनेमे देऊनही आहे कोट्यवधींची मालकीण, कोण आहे ही नायिका?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:21 PM2024-03-02T15:21:17+5:302024-03-02T15:23:17+5:30
बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं अगदी कठीणच आहे.
Divya Khosla kumar : बॉलिवूडसारख्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं अगदी कठीणच आहे. या हिंदी सिनेसृष्टीत असे काही सेलेब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोजकेच सिनेमे केले. पण रुपेरी पडद्यावर त्यांच्या सिनेमांची जादू काही चालली नाही. एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट देऊन इंडस्ट्रीतील या अभिनेत्रींकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. यातील एक नाव म्हणजे दिव्या खोसला कुमार. असं असलं तरी देखील बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं.
आपल्या १९ वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत दिव्याचा एकही चित्रपट हिट झाला नाही. आपल्या अदा, सौंदर्याने चाहत्याांना भूरळ घालणारी अभिनेत्री सिनेजगतात मात्र अपयशी ठरली. हल्ली सोशल मीडियावर दिव्या खोसला कुमार कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अभिनेत्रीने एका प्रतिष्ठित कुटुंबाची सून होण्यासाठी आपलं करिअर पणाला लावल्याचं सांगितलं जातं. दिव्याने बॉलिवूड इंस्ट्रीला रामराम करत प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत संसार थाटत नव्या आयुष्याची सुरुवात केली. T-Series म्युझिक आणि फिल्म प्रोडक्शन कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्याशी दिव्याने लग्न केलं.
किती आहे कमाई ?
मीडिया रिपोर्टनूसार, अभिनेत्रीची कमाई ऐकून तुम्ही विचारत पडाल. लग्नानंतर दिव्याची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये आहे. तर भूषण कुमार यांची एकूण संपत्ती १०,००० कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार, त्यांचे कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत १७५ व्या क्रमांकावर आहे.
दिग्दर्शन क्षेत्रात ठेवलं पाऊल -
२००४ मध्ये दिव्यानं तेलुगू चित्रपट 'लव्ह टुडे' आणि हिंदी चित्रपट 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर २००५ मध्ये लग्न झाल्यानंतर तिने 'सनम रे' चित्रपटातून ११ वर्षांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. २०१४ मध्ये, दिव्याने तिचा पहिला चित्रपट 'यारियां' दिग्दर्शित केला होता. तर २०१६मध्ये' सनम रे' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं .
दिव्यानं 'रॉय', 'खानदानी सफाखाना', 'बाटला हाऊस', 'मरजावां', 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी', 'लुडो', 'इंदू की जवानी' आणि 'यारियां २' या चित्रपटांच दिग्दर्शन केलंय.