धर्मेंद्रने लेकींवर घातली होती बंधने; घरातून बाहेर पडायचीही नव्हती परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 11:13 AM2023-11-02T11:13:14+5:302023-11-02T11:13:54+5:30
Dharmendra: इशाने एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र मुलींच्या बाबतीत किती सक्तीने वागायचे हे सांगितलं आहे.
बॉलिवूडचा हीमॅन अर्थात धर्मेंद्र (dharmendra) यांचं जवळपास संपूर्ण कुटुंब कलाविश्वात सक्रीय आहे. अगदी त्यांच्या पत्नीपासून ते नातवंडांपर्यंत अनेकांनी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी कारकिर्द केली आहे. त्यामुळे देओल कुटुंब सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतं. यात खासकरुन धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमामालिनी (hema malini) आणि तिच्या लेकी इशा- आहाना यांची सर्वाधिक चर्चा होते. 'गदर 2' च्या निमित्ताने धर्मेंद्र यांची सावत्र मुलं एकत्र आली. इशाने (isha deol) या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. तेव्हापासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच तिची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांनी लेकींवर किती बंधनं ठेवली होती हे तिने सांगितलं.
सध्या सोशल मीडियावर इशा आणि हेमा मालिनी यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. त्यांनी ही मुलाखत सिमी गरेवालच्या 'रेन्डेझव्हस विथ सिमी गरेवाल' या कार्यक्रमात दिली होती. यावेळी हेमा मालिनी आणि इशाने धर्मेंद्र त्यांच्या कुटुंबाविषयी किती पझेसिव्ह आहेत हे सांगितलं. सोबतच जुन्या विचारांचे असल्यामुळे ते लेकींनाही कसं बंधनात ठेवायचे हे सांगितलं.
किस्सा: सगळ्यांसमोर इशाने लगावली अमृता रावच्या कानशिलात; सेटवर पसरली होती शांतता
लाइफ पार्टनरची साथ किती आवश्यक आहे, असा प्रश्न हेमा मालिनी यांनी सिमी गरेवाल यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या स्वभावाविषयी भाष्य केलं. मुलांविषयी कोणतेही निर्णय घेताना पार्टनरची गरज लागत असते. धर्मेंद्र त्यांच्या लेकींबाबत फार पझेसिव्ह आहेत. त्यामुळे आहाना आणि इशा यांनी कायम सलवार-कमीज घालावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे जेव्हा ते घरी येतात त्यावेळी मुली सलवार-कमीज घालतात, असं हेमा मालिनी यांनी सांगितलं. त्यांचीच री पुढे इशाने ओढली आणि त्यांच्यावर असलेल्या बंधनांवर भाष्य केलं.
सिनेमात बिकिनी घालण्यापूर्वी इशाने घेतली होती आई-वडिलांची परवानगी; हेमा मालिनी म्हणाल्या...
"आमचे वडील कायम आम्हाला घरात थांबायला सांगायचे. ते आमच्या बाबतीत फार पझेसिव्ह होते. त्यामुळे आम्हाला बाहेर जायचीही परवानगी नव्हती. ते टिपिकल पंजाबी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे तेच विचार ते आमच्यावर थोपवायच. मुलींनी घरात बसावं, पंजाबी ड्रेस घालावा वगैरे. पण, आम्ही आमच्या आईमुळे घराबाहेर पडू शकायचो. तिच्यामुळे बाहेर खेळायचो. इतर गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकायचोय", असं इशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "शाळा-कॉलेजच्या वेळेतही आम्हाला घराबाहेर जायची परवानगी नव्हती. त्यांनी कधीच आम्हाला स्पोर्ट्स कार्यक्रमांसाठी मुंबई बाहेर जाऊ दिलं नाही. ते खूप काळजी घ्यायचे आमची."
दरम्यान, सध्या इशा आणि हेमा मालिनी यांची ही मुलाखत चांगलीच चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे मुलींवर बंधन घालणाऱ्या धर्मेंद्र यांनी अलिकडेच वयाच्या ८७ व्या वर्षी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत किसिंग सीन दिला. त्यांच्या या सीनची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.