कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील; लवकरच होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 09:45 AM2024-10-18T09:45:09+5:302024-10-18T09:48:18+5:30
कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे.
Kangana Ranaut :बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची(Kangana Ranaut) इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
We are glad to announce we have received the censor certificate for our movie Emergency, we will be announcing the release date soon. Thank you for your patience and support 🇮🇳
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 17, 2024
अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 'इमर्जन्सी' सिनेमा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण, सेन्सॉर प्रमाणपत्रच नसल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. अखेर वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहल्यानं हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं.
दरम्यान, सेन्सॉरकडून या सिनेमाला हिरवा कंदील मिळाला. काही दिवसांतच चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेय. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहलंय, "आम्हाला सांगताना आनंद होतोय की, इमर्जन्सी या चित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालं आहे. आम्ही लवकरच चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करू. तुमचा संयम आणि पाठिंब्यासाठी खूप धन्यवाद".
कंगना राणौत स्टारर इमर्जन्सी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित, शीख अंगरक्षकाने केलेल्या हत्येचाही त्यात उल्लेख आहे. शिरोमणी अकाली दलसह शीख समुदायाच्या अनेक संघटनांनी सिनेमावर आक्षेप घेतला होता. म्हणून 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. यावर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं नाही. अखेर निर्मात्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत सेन्सॉर प्रमाणपत्राची मागणी केली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र मिळत नसल्याने निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डविरोधात याचिका दाखल केली होती.