अक्षय कुमारसोबत रोमॅंटिक सीन करताना करीना कपूरला यायचं 'या' गोष्टीचं टेन्शन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 09:09 AM2024-11-06T09:09:24+5:302024-11-06T09:13:48+5:30

बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

bollywood actress kareena kapoor revealed in interview about she felt awkward while doing romantic scene with akshay kumar in films | अक्षय कुमारसोबत रोमॅंटिक सीन करताना करीना कपूरला यायचं 'या' गोष्टीचं टेन्शन, म्हणाली...

अक्षय कुमारसोबत रोमॅंटिक सीन करताना करीना कपूरला यायचं 'या' गोष्टीचं टेन्शन, म्हणाली...

Kareena Kapoor: बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने आजवर  तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्ष एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सलमान खान (Salmaan Khan ) तसेच अक्षय कुमार (Akshay Kumar) यांसारख्या कित्येक बड्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. अशातच अभिनेत्रीचा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. या व्हिडीओमध्ये करीनाने अभिनेता अक्षय कुमारच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

करीनाने 'ट्विंकल खन्ना'च्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारच्या बाबतीत एक खुलासा केला होता. मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटात अक्षय कुमारसोबत रोमॅन्टिक सीन्स करताना कोणत्या गोष्टीचं टेन्शन यायचं? याबाबत तिने खुलासा केला आहे. त्या मुलाखतीत करीना म्हणाली होती की, "मी माझ्या बहीण करिष्माच्या को-स्टारसोबत रोमान्स केला आहे, जो अनुभव खूपच विचित्र आहे. करिष्माने बऱ्याच चित्रपटांमध्ये अक्षय कुमारसोबत केलं आहे. जेव्हा करिष्मा चित्रपटांमध्ये काम करायची तेव्हा मी शाळेत जायचे. त्यादरम्यान मी कधी-कधी करिष्माच्या शूटिंगच्या ठिकाणीही जायचे तेव्हा मी अक्षयसोबत खेळायचे". 

पुढे करीना म्हणाली, एकेकाळी अक्षयने माझ्या बहिणीसोबत काम केलं आहे. आता मी त्याच्यासोबत चित्रपटात रोमॅन्टिक सीन्स देते. हा सगळा अनुभव माझ्यासाठी विचित्र आहे. 

करीना कपूरने तिच्या करिअरमध्ये अक्षय कुमारसोबत 'दोस्ती', 'टशन', 'अजनबी' तसेच 'ऐतराज' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. 

Web Title: bollywood actress kareena kapoor revealed in interview about she felt awkward while doing romantic scene with akshay kumar in films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.