परवीन बाबींच्या संपत्तीसाठी नातेवाईकांनी पाहिली 11 वर्ष वाट; प्रकरण कोर्टात गेलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:53 AM2023-08-11T11:53:43+5:302023-08-11T11:55:09+5:30

Parveen Babi: परवीन बाबी यांचा वारसदार नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवण्यास सुरुवात केली होती.

bollywood actress parveen babi11-years-of-relatives-wear-court-steps-for-wealth-who-finally-got-actress-immense-wealth-a | परवीन बाबींच्या संपत्तीसाठी नातेवाईकांनी पाहिली 11 वर्ष वाट; प्रकरण कोर्टात गेलं अन्...

परवीन बाबींच्या संपत्तीसाठी नातेवाईकांनी पाहिली 11 वर्ष वाट; प्रकरण कोर्टात गेलं अन्...

googlenewsNext

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी (Parveen Babi).  त्या काळातील सर्वात बोल्ड आणि मादक अभिनेत्री म्हणून परवीन बाबी यांची ओळख निर्माण झाली होती. विशेष म्हणजे संपूर्ण आयुष्य प्रसिद्धी, झगमगाट आणि संपत्तीमध्ये घालवणाऱ्या परवीन बाबी या शेवटच्या दिवसात एकट्या पडल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांचा मृत्यूदेखील अत्यंत दुर्दैवी असा झाला. परवीन बाबी यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला होता. तर, दुसरीकडे मात्र त्यांना एकटं पाडणारे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या संपत्तीसाठी लढत होते.

परवीन बाबी यांचं निधन झाल्यानंतर त्यांची संपत्ती कोणाला मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. या संपत्तीवर त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी दावा केला होता. परंतु, परवीन बाबी यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात या संपत्तीविषयी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. त्यामुळे या संपत्तीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. संपत्ती मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी कोर्टात धाव घेतली होती.

कसा झाला परवीन बाबी यांचा मृत्यु?

यशाच्या शिखरावर असलेल्या परवीन बाबी यांना पॅरानाइड स्कित्जोफ्रेनिया हा मानसिक आजार झाल्याचं म्हटलं जातं. या आजारामुळेच त्यांचं निधन झालं असंही म्हटलं जातं. १९८३ मध्ये परवीन विदेशात स्थायिक झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर १९८९ मध्ये त्या पुन्हा मायदेशी परतल्या. परंतु, यावेळी त्यांच्यात कमालीचा बदल झाला होता. वाढलेलं वजन, निस्तेज चेहरा यामुळे त्यांना ओळखणंही कठीण होतं.

अखेरच्या दिवसात परवीन बाबी पडल्या होत्या एकट्या

प्रसिद्ध, पैसा, संपत्ती सारं काही परवीन यांच्या जवळ होतं. पण, त्यांच्यासोबत राहणारी कोणतीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे अखेरच्या दिवसांमध्ये त्या एकट्याच होत्या. त्यांचं एकटेपण इतकं वाढलं होतं की त्याचा परिणाम त्यांच्या मनावरही झाला. त्यामुळे सतत कोणी तरी आपल्याला जीवे मारतंय असे त्यांना भास व्हायचे.

तीन दिवस मृतदेह होता घरात

परवीन बाबी यांचा मृत्यू झाला ही गोष्ट कोणालाच कळली नाही. परिणामी, ३ दिवस त्यांचा मृतदेह घरातच होता. त्यांच्या दरवाज्याबाहेर ठेवलेले ब्रेड-दूध तीन दिवसांपासून त्याच जागी होते. त्यामुळे शेजारच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. २० जानेवारी २००५ रोजी जुहूमधील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

काय झालं परवीन यांच्या संपत्तीचं?

परवीन बाबी या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या. त्या काळात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यामुळे सहाजिकच त्यांची संपत्तीदेखील तितकीच होती. पण, त्यांना कोणी वारसदार नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीचं पुढे काय झालं हा प्रश्न अनेकांना पडला होता. परवीन यांच्या मृत्यूनंतर जवळपास 11 वर्ष त्यांच्या संपत्तीचा वाद कोर्टात चालला. त्यांच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. या वादावर 11 वर्षानंतर पडदा पडला होता. न्यायालयाने परवीन यांच्या मृत्यूपत्राला मंजुरी दिली. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार, परवीन यांच्या संपत्तीचा 80 टक्के भाग गरजू महिला आणि मुलांच्या मदतीकरता देण्यात आला आणि 20 टक्के भाग तिच्या मामाला मिळाला.

दरम्यान, परवीन याच्या नावे जुहूमधला समुद्रकिना-याजवळचा फ्लॅट, जुनागढ येथील हवेली, सोनं, बँकेत असलेले 20 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट आणि अन्य पैसे इतकी संपत्ती होती. 
 

Web Title: bollywood actress parveen babi11-years-of-relatives-wear-court-steps-for-wealth-who-finally-got-actress-immense-wealth-a

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.