अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषला कापावे लागणार केस; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:34 PM2021-11-10T15:34:17+5:302021-11-10T15:34:47+5:30

Payal ghosh: काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या मुलाने कर्करोगग्रस्त मुलांसाठी त्याचे केस कर्करोग सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नंतर आता पायल घोषनेदेखील असाच निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

bollywood actress payal ghosh donate her hair for cancer patients | अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषला कापावे लागणार केस; कारण...

अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषला कापावे लागणार केस; कारण...

googlenewsNext

बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे पायल घोष(payal ghosh). समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होणारी पायल कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. अलिकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्यावर गंभीर आरोप करुन पायल चर्चेत आली होती. मात्र, यावेळी ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे पायल सध्या कर्करोगग्रस्त मुलांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या मुलाने कर्करोगग्रस्त मुलांसाठी त्याचे केस कर्करोग सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या नंतर आता पायल घोषनेदेखील असाच निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

पायलने तिच्या वाढदिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वॉक्हार्ट रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेणाऱ्या मुलांसाठी तिचे केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोगावर उपचार घेत असताना अनेकांना केमो थेरपीतून जावं लागतं. यामुळे या मुलांचे केस गळतात. म्हणूनच, या मुलांसाठी पायलने केस दान करायचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

"खरं तर हा संपूर्ण आठवडाच माझ्यासाठी वाढदिवसाचा आहे. त्यामुळे या आठवड्यात मला शक्य होईल तितक्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याचा माझा प्रयत्न असतो. मागील एक वर्षाचा काळ सगळ्यांसाठीच कठीण होता. पण या कठीण प्रसंगात प्रत्येकाने एकमेकांची साथ देत या संकटावर मात केली. याच गोष्टीचा मला फार आनंद होत आहे", असं पायल म्हणाली.

पुढे ती म्हणते, "आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे एकमेकांना मदत करत आलो तशीच मदत या पुढेही सगळ्यांना करु. ज्यावेळी मी कर्करोगग्रस्त मुलांना पाहते त्यावेळी मला खूप वाईट वाटतं. त्यांमुळेच त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न मी करत असते."

दरम्यान, पायल कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. पायलने २०१७ मध्ये 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पायलने Oosaravelli आणि Mr. Rascal यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं.
 

Web Title: bollywood actress payal ghosh donate her hair for cancer patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.