"आपण जुगाड करतो आणि ते... " प्रियांका चोप्राने सांगितला हॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील फरक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:23 AM2024-10-24T10:23:35+5:302024-10-24T10:25:09+5:30

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीत तिला काम करताना जाणवलेला फरक तिने सांगितला आहे.

bollywood actress priyanka chopra revealed in interview about difference between bollywood and hollywood industry | "आपण जुगाड करतो आणि ते... " प्रियांका चोप्राने सांगितला हॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील फरक 

"आपण जुगाड करतो आणि ते... " प्रियांका चोप्राने सांगितला हॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील फरक 

Priyanka Chopra :बॉलिवूडची 'देसी गर्ल' म्हणजेच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच मायदेशी परतली. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या कामानिमित्त प्रियांका भारतात आली होती. सध्या अभिनेत्री 'सिटाडेल' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अशातच ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय.  

नुकतीच प्रियांका चोप्राने 'फोर्ब्स इंडियाला' मुलाखत दिली. या मुलाखती तिने बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असलेला फरक यावर भाष्य केलं. त्यादरम्यान ती म्हणाली, "मला असं वाटतं प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा वेगवेगळ्या असतात. आपण प्रत्येकजण त्यांचं पालन करत असतो. मी बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे. त्यामुळे मला या दोन्ही इंडस्ट्रीत एक वेगळेपण जाणवलं. हॉलिवूडमध्ये बरेचसे व्यवहार कागदोपत्री केले जातात. तिथे वेळेला मर्यादा असते".

पुढे अभिनेत्री म्हणाली, "आपल्याकडे काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीवर पर्याय शोधले जातात. बॉलिवूडमध्ये काही ना काही मार्ग काढून काम पूर्ण केलं जातं. आपण कोणतीही गोष्ट हलक्यात घेतो. अरे, काही नाही हे काम होऊन जाईल असं आपण म्हणतो. माझा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. नाहीतर जगभरात चित्रपट निर्मिती करण्याची पद्धत एकच आहे. हाच फरक मला दोन्ही इंडस्ट्रीमध्ये जाणवला"

Web Title: bollywood actress priyanka chopra revealed in interview about difference between bollywood and hollywood industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.