तृप्ती डिमरीने महाभारतातील 'ही' व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर रंगवायची इच्छा केली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 04:13 PM2024-09-26T16:13:48+5:302024-09-26T16:15:26+5:30

तृप्ती डिमरीने ही पौराणिक भूमिका साकारायची इच्छा केली व्यक्त. काय म्हणाली बघा (tripti dimri)

bollywood actress Tripti Dimri expressed her love for mythological stories mahabharat draupadi | तृप्ती डिमरीने महाभारतातील 'ही' व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर रंगवायची इच्छा केली व्यक्त

तृप्ती डिमरीने महाभारतातील 'ही' व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर रंगवायची इच्छा केली व्यक्त

'बुलबुल', 'अॅनिमल' अशा सिनेमांमधून लोकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. तृप्तीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिच्या चाहत्यांच्या मनात स्वतःचं खास स्थान मिळालंय. बोल्ड अन् विविध धाटणीच्या भूमिका करुन तृप्तीने बॉलिवूडमध्ये तिचं खास अस्तित्व निर्माण केलंय. तृप्तीचा यावर्षी रिलीज झालेल्या 'बॅड न्यूज' सिनेमानेही प्रेक्षकांचं चांगलं पसंती मिळवलं. नुकत्याच एका मुलाखतीत तृप्तीने तिला कोणती पौराणिक भूमिका साकारायला आवडेल याचा खुलासा केलाय

तृप्तीला साकारायचीय ही पौराणिक भूमिका

अभिनेत्री तृप्ती डिमरी नुकतीच India Today Conclave मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तृप्ती म्हणाली, "मला पौराणिक व्यक्तिरेखा साकारायची खूप इच्छा आहे. The Palace of Illusions या पुस्तकात महाभारतातील द्रौपदीचा दृष्टीकोन दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अशी एखादी ऑफर जर मला मिळाली तर मला नक्कीच ती भूमिका साकारायला आवडेल." अशाप्रकारे महाभारत आणि द्रौपदीचा उल्लेख करुन तृप्तीने तिची इच्छा व्यक्त केलीय.


तृप्तीने बायोपिकसाठी घेतलं या अभिनेत्रींचं नाव

याच मुलाखतीत भविष्यात कोणत्या अभिनेत्रीच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारायला आवडेल असं विचारताच तृप्ती म्हणाली, "मी जया बच्चन यांची फार मोठी चाहती आहे. याशिवाय मीना कुमारी, मधुबाला या माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे भविष्यात या अभिनेत्रींच्या बायोपिकमध्ये भूमिका करायला आवडेल." तप्ती लवकरच 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' आणि 'भूल भूलैय्या ३' या सिनेमांमध्ये दिसणार आहे.

Web Title: bollywood actress Tripti Dimri expressed her love for mythological stories mahabharat draupadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.