वयाच्या पन्नाशीत बॉलिवूडची ही अभिनेत्री झाली ग्रॅज्युएट, अभिनेत्याने पत्नीसाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:11 AM2024-01-17T10:11:36+5:302024-01-17T10:12:07+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला रामराम केला असून सध्या ती लेखनात करिअर करते आहे.

Bollywood actress Twinkle Khanna graduated at the age of fifty, the actor Akshay Kumar wrote a special post for his wife | वयाच्या पन्नाशीत बॉलिवूडची ही अभिनेत्री झाली ग्रॅज्युएट, अभिनेत्याने पत्नीसाठी लिहिली खास पोस्ट

वयाच्या पन्नाशीत बॉलिवूडची ही अभिनेत्री झाली ग्रॅज्युएट, अभिनेत्याने पत्नीसाठी लिहिली खास पोस्ट

अभिनेत्री आणि अक्षय कुमार(Akshay Kumar)ची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने अभिनय क्षेत्राला अलविदा केला आहे. चित्रपट सोडून अभिनेत्रीने लेखनात आपले करिअर करत आहे. यासोबतच तिने आपला अपूर्ण अभ्यासही पूर्ण केला आहे. ट्विंकल खन्नाने वयाच्या ५० व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. अक्षय कुमारने एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर पत्नी ट्विंकलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ट्विंकलने ग्रॅज्युएशन कॅप घातलेली दिसत आहे. या फोटोसोबत अभिनेत्याने पत्नीसाठी एक प्रेमळ नोटही लिहिली आहे. त्यात अक्षयने लिहिले की, 'दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असे सांगितले होते, तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. पण ज्या दिवशी मी तुला एवढी मेहनत करताना पाहिले तेव्हा मला समजले की मी एका सुपरवुमनशी लग्न केले आहे. तू घर, करिअर आणि आपली मुले तसेच विद्यार्थी जीवन सांभाळले. 

अभिनेत्याने पुढे म्हटले की, तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी माझ्या मनात विचार आला की, मी पण थोडा शिकलो असतो तर मलाही खूप शब्दसंपदा मिळाली असती आणि मी तुला सांगू शकलो असतो की, टीना मला तुझ्यावर किती गर्व आहे. अभिनंदन आणि आय लव्ह यू. 

पोस्ट शेअर करत ट्विंकलने व्यक्त केला आनंद 
याशिवाय ट्विंकल खन्नानेही तिच्या मोठ्या दिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती पदवी घेताना दिसत आहे. या पोस्टसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, आणि हा माझा पदवीचा दिवस आहे...गोल्डस्मिथमध्ये माझा पहिला दिवस जणू काल किंवा अनेक वर्षांपूर्वीचा होता...सुंदर थाट, सुंदर साडी आणि माझे कुटुंब माझ्या कल्पनेपेक्षा हा दिवस अधिक खास बनवत आहे. आपण नेहमी स्वतःला काहीतरी करण्याची प्रेरणा देत राहिले पाहिजे. सहमत किंवा असहमत'.

ट्विंकल खन्ना आणि तिचा मुलगा आरवने दोन वर्षांपूर्वी लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला होता. त्याच वेळी, आता अभिनेत्रीची पदव्युत्तर पदवी पूर्ण झाली आहे. ट्विंकलला तिच्या ग्रॅज्युएशनबद्दल सर्वजण शुभेच्छा देत आहेत. 
 

Web Title: Bollywood actress Twinkle Khanna graduated at the age of fifty, the actor Akshay Kumar wrote a special post for his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.