"चित्रपट फ्लॉप झाला तर पैसेही...." कलाकारांच्या मानधनाबद्दल अक्षय कुमार स्पष्टच बोलला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:26 PM2024-11-18T13:26:54+5:302024-11-18T13:38:23+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने कलाकारांच्या मानधनाबद्दल भाष्य केलं आहे.
Akshay Kumar : अजय देवगणचा (Ajay Devgan) बहुप्रतीक्षित 'सिनेमा सिंघम' अगेन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) कॅमिओ पाहायला मिळाला. सध्या सर्वत्र या सिनेमाचा बोलबाला आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कलाकारांच्या मानधनावर भाष्य केलं आहे.
हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समिट २०२४ मध्ये दिलेल्या मुलाखतीत अक्षय आणि अजय देवगण यांना एक प्रश्न विचारण्यात आला. सध्या चित्रपटांचं बजेट वाढतं, कारण कलाकार त्यासाठी तगडी फीस घेतात. याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर उत्तर देत अजय देवगण म्हणाला, "अॅक्टर स्क्रिप्ट, चित्रपट आणि प्रोजेक्टनुसार फीस घेतात. शिवाय काही जण कामानूसार मानधन आकारतात".
पुढे याच प्रश्नावर अक्षय कुमार आपलं मत मांडताना म्हणाला, "अजयने जे काही सांगितलं त्यावर मी सहमत आहे. जर एखादा चित्रपट चालला तर आम्हाला पैसे मिळतात, नाही चालला तर आम्हाला पैसे मिळत नाहीत. त्यात चित्रपटाच्या निर्मात्यांच नाही तर कलाकाराचही नुकसान होतं. दरम्यान, एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करताना आमचं संपूर्ण लक्ष कामावर असतं कारण जर चित्रपट बॉक्सऑफिसवर चालला नाही तर होणाऱ्या नुकसानीला आम्हालाही तोंड द्यावं लागतं".
काम केल्याचे पैसेही मिळत नाहीत
अक्षय कुमारच्या वक्तव्याला समर्थन दर्शवत अजय देवगणने सांगितलं, "काही वेळातर त्यातील हिस्सेदारी देखील मिळत नाही. फीस न घेता काम करावं लागतं. असेही प्रसंग येतात." असा खुलासा अभिनेत्याने केला.
नुकतीच अजय देवगणने नवीन सिनेमाची घोषणा केली आहे जो तो स्वत: दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारला मुख्य भूमिका देण्यात आली आहे.