आसमंतात दुमदुमला श्रीरामाचा जयघोष; अनुपम खेर यांनी शेअर केला फ्लाइटमधील व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:44 AM2024-01-22T09:44:33+5:302024-01-22T09:45:18+5:30
Anupam kher: अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रत्येक प्रवासी श्री रामाचा जयघोष करताना दिसत आहे.
अयोध्येतील राम मंदिरात आज (दि. २२) रामलला विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. यामध्येच सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण असून प्रत्येक ठिकाणी श्रीरामाचा जयघोष सुरु आहे. यामध्येच अभिनेता अनुपम खेर (anupam kher) यांनी विमानातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रत्येक प्रवासी श्री रामाचा जयघोष करताना दिसत आहे.
अनुपम खेर सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांनी नुकताच एक्सवर (ट्विटर) फ्लाइटमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत फ्लाइटमध्ये भक्तीमय वातावरण झाल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर प्रत्येक प्रवासी श्रीरामाचा जयघोष करत आहे.
सब राम भक्तों के साथ मैं अयोध्या में पहुँच गया हूँ।हवाई जहाज़ में कमाल की भक्ति का वातावरण था।कीर्तन, राम जी की जय जय की गूंज।वाह! हम धन्य है। हमारा देश धन्य है! जय श्री राम! 🕉🙏🕉🕉🕉🙏 pic.twitter.com/kMYLUJMrKf
— Anupam Kher (@AnupamPKher) January 21, 2024
"समस्त रामभक्तांसोबत अयोध्या नगरीत पोहोचलो आहे. विमानात कमालीचं भक्तीमय वातावरण होतं. किर्तन, श्रीरामाचा जयघोष. अध्य आहोत आपण. आपला देशही धन्य आ"हे, असं कॅप्शन अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.
दरम्यान, अनुपम खेर यांच्या पूर्वी अभिनेत्री कंगना रणौतनेही एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती राम मंदिरात झाडू काढताना दिसत होती. तसंच तिने रामभद्राचारीयांचीही भेट घेतल्याचं यात दिसून आलं.