पडद्यावरील 'भारत'ने केले टीम इंडियाचे हटके कौतुक, भाईजानचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 11:22 AM2019-06-17T11:22:26+5:302019-06-17T11:31:02+5:30

भारतीय संघावर बॉलिवूड, राजकारणी आणि सर्वसामान्य जनतेनं सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Bollywood celebrities congratulate team india for win over pakistan in world cup match | पडद्यावरील 'भारत'ने केले टीम इंडियाचे हटके कौतुक, भाईजानचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

पडद्यावरील 'भारत'ने केले टीम इंडियाचे हटके कौतुक, भाईजानचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्दे टीम इंडियाने पाकिस्तानला मात देत एकतर्फी विजय मिळवलासलमान खान, अनिल कपूर, विवेक ऑबेरॉय आणि इशा गुप्ता यांनी भारत संघाचे अभिनंदन केले

संपूर्ण जगावर सध्या वर्ल्ड कप फिव्हर आहे. गत रविवारी जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यावर म्हणजेच  भारत-पाकिस्तानच्या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागले होते. यात बी-टाऊनचे सेलिब्रेटीही मागे नव्हते. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात हीट समजला जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला मात देत एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघावर बॉलिवूड, राजकारणी आणि सर्वसामान्य जनतेनं सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव केला. सलमान खान, अनिल कपूर, विवेक ऑबेरॉय आणि इशा गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारत संघाचे अभिनंदन केले. तर सैफ अली खान आणि रणवीर सिंग टीमला चिअरअप करण्यासाठी थेट मँचेस्टरमध्ये दिसले. 




सलमान खानने टीमला ट्विटरवर शुभेच्छा देताना मॅचच्या मुडमधला फोटो टाकत लिहिले, टीम भारतचे भारतकडून अभिनंदन.    




अनिल कपूरने लिहिले, आजचा विजय महान होता आणि सामना इंटरेस्टिंग झाला. रविवार खूप चांगला गेला.  टीम इंडियाचे अभिनंदन   
विवेक ऑबेरॉय, इशा गुप्ता आणि अदनान सामीने देखील टीम इंडियाचे अभिनंदन केले. 



 




भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पराभव केला. भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव 40 षटकात 6 बाद 212 धावांत रोखला गेला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या 5 षटकात 136 धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. मात्र, त्यांना केवळ 46 धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.
 

Web Title: Bollywood celebrities congratulate team india for win over pakistan in world cup match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.