Bollywood New Year 2023: सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 08:00 AM2022-12-31T08:00:00+5:302022-12-31T08:00:01+5:30

Bollywood Celebs New Year 2023: अर्ध्यापेक्षा अधिक बॉलिवूड नववर्षाच्या स्वागतासाठी विदेशात रवाना झालं आहे... चला तर जाणून घेऊ या, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा न्यू ईअर प्लान...

Bollywood Celebs New Year 2023 Celebration Sidharth Kiara Malaika Arjun | Bollywood New Year 2023: सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?  

Bollywood New Year 2023: सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?  

googlenewsNext

मावळत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नव्या वर्षाच्या स्वागताला अख्ख जग सज्ज आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. अर्ध्यापेक्षा अधिक बॉलिवूडनववर्षाच्या स्वागतासाठी विदेशात रवाना झालं आहे. कोणी दुबईत, कुणी स्वित्झर्लंड तर कुणी अबूधाबीत नववर्ष साजरं करणार आहेत. चला तर जाणून घेऊ या, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा न्यू ईअर प्लान....

मौनी रॉय...

मौनी रॉय व तिचा पती न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी अबुधाबीला पोहोचले आहेत. मौनीनं इथले काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत मौनी एकापेक्षा एक हॉट, सेक्सी पोझ देताना दिसतेय.

रकुलप्रीत सिंग

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगही न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी फुकेत येथे गेली आहे. इथे तिची धम्माल मस्ती सुरू आहे. याचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सिद्धार्थ-कियारा...

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी हे बॉलिवूडचं सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल एकत्र न्यू ईअर साजरं करणार आहे. यासाठी हे कपल दुबईला रवाना झालं आहे.

करिना-सैफ...

करिना कपूर व सैफ अली खान आपल्या दोन्ही मुलांसह विदेशात आहेत. खान कुटुंब स्वित्झर्लंडमध्ये  न्यू ईअर सेलिब्रेट करणार आहे. मुलांसोबत एन्जॉय करत असतानाचा एक फोटो करिनाने शेअर केला आहे.

कार्तिक आर्यन...

कार्तिक आर्यन पॅरिसमध्ये पोहोचला आहे. पॅरिसमध्ये तो नवीन वर्ष साजरं करणार आहे. पॅरिसचा एक फोटो त्याने शेअर केला आहे.

मलायका-अर्जुन

मलायका अरोरा व अर्जुन कपूर हे कपलही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. आजच हे कपल विदेशात रवाना झालं. मलायका व अर्जुन कुठे नवं वर्ष साजरं करणार आहेत, याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. 

Web Title: Bollywood Celebs New Year 2023 Celebration Sidharth Kiara Malaika Arjun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.