बॉलिवूडच्या अण्णाला पितृशोक
By Admin | Published: March 1, 2017 01:02 PM2017-03-01T13:02:54+5:302017-03-01T13:08:41+5:30
बॉलिवूडमध्ये अण्णा नावाने प्रचलित असलेल्या सुनील शेट्टीचे वडिल वीरप्पा शेट्टी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - बॉलिवूडमध्ये अण्णा नावाने प्रचलित असलेल्या सुनील शेट्टीचे वडिल वीरप्पा शेट्टी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच क्रँडी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री दीड वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2013 मध्ये सुनीलच्या वडिलांना पॅरलिसिसचा झटका आला होता. यानंतर सुनीलने त्याच्या साऊथ रेसिडेंसमध्ये खास वडिलांसाठी आयसीयू तयार केला होता. एवढेच नाही तर, केवळ आपल्या वडिलांसाठी सुनीलने आपले करिअर डावावर लावले. वडिलांची सेवा करता यावी म्हणून अनेक वर्षे त्याने चित्रपट साईन केला नव्हता.
2013 मध्ये आपल्या नव्या डेकोरेशन शोरूमच्या लॉन्चवेळी सुनील शेट्टीने वडिल हेच माझे खरे हिरो असल्याचे म्हटले होते. या जागी माझे वडिल काम करायचे. ते येथे प्लेट स्वच्छ करायचे. कारण याठिकाणी ते वेटर होते. ते माझे खरे हिरो आहेत. वयाच्या ९ वर्षांपासून ते माझ्यासाठी खपत आलेत, असे सुनील म्हणाला होता.
सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिनेही आजोबाच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अथिया आपल्या आजोबांच्या सर्वात जवळ होती. अनेक मुलाखतीत, आज मी जे काही आहे ते आजोबांमुळेच आहे, असे अथियाने सांगितलेय. माझ्या आजोबांनी मुलगा आणि मुलगी यात कधीच भेद केला नाही.