म्हणायला ‘फ्लॉप’; पण अलिशान आयुष्य जगत आहेत सहा नट्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 08:00 AM2019-12-17T08:00:00+5:302019-12-17T08:00:12+5:30

होय, म्हणायला फ्लॉप पण अब्जाधीशांशी लग्न करून अलिशान आयुष्य जगणा-या या आहेत काही अभिनेत्री...

bollywood flop actresses are enjoying marriage with billionaires | म्हणायला ‘फ्लॉप’; पण अलिशान आयुष्य जगत आहेत सहा नट्या 

म्हणायला ‘फ्लॉप’; पण अलिशान आयुष्य जगत आहेत सहा नट्या 

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये एखादा एका रात्रीत स्टार होतो तर एखादा एका रात्रीत रस्त्यावर येतो. कदाचित म्हणूनच बॉलिवूडला मायानगरी म्हणतात. स्टार होण्याच्या आशेने रोज नवे चेहरे या मायानगरीत येतात. काही लोकप्रिय होतात तर काही मायानगरीच्या गर्दीत येतात तसे हरवतात. फ्लॉपचा शिक्का माथी लागलेलेही येथे अनेक भेटतील. अर्थात फ्लॉप असूनही अलिशान आयुष्य जगणारेही येथे अनेक आहेत. आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, म्हणायला फ्लॉप पण अब्जाधीशांशी लग्न करून अलिशान आयुष्य जगणा-या या आहेत काही अभिनेत्री...
 

आयशा टाकिया

अभिनेत्री आयशा टाकिया हिने ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली आणि अचानक नावारूपास आली. पुढे सलमानसोबतच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. पण सध्या आयशा कुठेही नाही. 2004 मध्ये फरहान आझमी या हॉटेल व्यावसायिकाशी लग्नगाठ बांधली. राजकीय नेते अबू आझमी हे आयशाचे सासरे. लग्नानंतर आयशा बॉलिवूडमधून गायब झाली. पण आज ती अलिशान आयुष्य जगतेय. तिला एक मुलगा आहे.
 
ईशा देओल

हेमा मालिनीची मुलगी असूनही ईशा देओल बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ईशाने 2012 मध्ये हिºयांचा व्यवयाय असलेल्या भारत तख्तियानीसोबत लग्न केले. ईशा सध्या अलिशान आयुष्य जगतेय.
 
गायत्री जोशी

‘स्वदेश’ हा सिनेमा आठवत असेल तर त्यातली हिरोईनही तुम्हाला आठवणार. ही हिरोईन कोण तर गायत्री जोशी. ‘स्वदेश’ हा गायत्रीचा पहिला आणि अखेरचा सिनेमा ठरला. यानंतर    2005 मध्ये तिने रिअल इस्टेट उद्योगपती विकास ओबेरॉयशी लग्न केले.

सेलिना जेटली

 हॉट आणि बोल्ड इमेजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सेलिना जेटली हिने बºयाच चित्रपटांमध्ये काम केले. पण नंतर अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तिने बॉलिवूडला रामराम ठोकला.  सेलिना जेटलीने 2011 मध्ये हॉटेल बिझनेसमॅन पीटर हाग याच्याशी लग्न केले. सध्या सेलिना अलिशान आयुष्य जगतेय.

अमृता अरोरा

मलायका अरोराची बहीण अमृता अरोरा हिने 2002 मध्ये ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 2015 मध्ये आलेल्या ‘कुछ तो है तेरे मेरे दरमियांन’ हा सिनेमा तिचा शेवटचा सिनेमा. 2009 मध्ये अमृताने बिझनेसमॅन शकील लडकसोबत लग्न केले. आज ती अलिशान आयुष्य जगतेय.

असीन

‘गजनी’ आणि ‘रेडी’ सिनेमात झळकलेल्या असीनला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर तिने मायक्रोमॅक्स कंपनीचा मालक राहुल शर्मासोबत लग्नगाठ बांधली. सध्या ती सुद्धा सुखात आयुष्य जगतेय.

Web Title: bollywood flop actresses are enjoying marriage with billionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.