दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन आहेत कोट्यधीश ; संपत्तीचा आकडा पाहून डोळे विस्फारतील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 11:14 AM2021-11-07T11:14:04+5:302021-11-07T11:14:42+5:30
Kamal Haasan: कमल हासन यांच्या प्रोफेशनल लाईफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. पण पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील नावजलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे कमल हासन (Kamal Haasan). उत्तम अभिनयाच्या जोरावर कमल हासन यांनी आज केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. त्यामुळे आज जगभरात त्यांचे चाहते असल्याचं पाहायला मिळतं. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. त्यामुळेच आज कमल हासन यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ.
कमल हासन यांच्या प्रोफेशनल लाईफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. पण पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. कमल हासन यांनी लहानपणापासूनच त्यांच्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे कलाविश्वातील त्यांचा अनुभव आणि प्रवास दांडगा आहे.
वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी जेमिनी गणेशन आणि सावित्री यांच्यासह १९६० मध्ये 'कलाथुर कन्नम्मा' (Kalathur Kannammaa) या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटानंतर त्यांचा कलाविश्वात सुरु झालेला प्रवास अजूनही कायम आहे. आज ते अभिनेता असण्यासोबतच स्क्रिप्ट रायटिंग, दिग्दर्शक, निर्माते, डान्सर अशा विविधांगी भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळेच त्यांची एकूण संपत्ती किती ते जाणून घेऊयात.
कमल हासन यांची संपत्ती पाहून विस्फारतील डोळे
सूत्रांच्या माहितीनुसार, कमल हासन हे एकमेव असे अभिनेता आहेत,ज्यांनी १९९४ मध्ये १ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तसंच सध्याच्या घडीला ते प्रत्येक चित्रपटासाठी ३० कोटी मानधन घेतात. इतकंच नाही तर बिग बॉस तामिळ ५ साठी त्यांनी ५५ कोटी रुपये घेतले होते. तसंच ब्रॅण्ड एंडोर्समेंट, प्रोडक्शन वेंचर्स आणि अन्य गुंतवणूक यांमधून ते कोट्यवधींची कमाई करतात.
दरम्यान, लवकरच ते लोकेश कनगराज यांच्या 'विक्रम' या चित्रपटात झळकणार आहे. तसंच ते ‘इंडियन 2’ या चित्रपटातही झळकणार आहेत.