Tandav Row : सुप्रीम कोर्टातील युक्तीवादानंतर कोंकणा सेन म्हणाली, "... चला सर्वांनाच अटक करा?"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 03:08 PM2021-01-28T15:08:29+5:302021-01-28T15:20:30+5:30
वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी अनेक ठिकाणी दाखल करण्यात आला आहे एफआयआर
Tandav Row : सुप्रीम कोर्टातील युक्तीवादानंतर कोंकणा सेन म्हणाली, "... तर सर्वांनाच अटक करणार?"
हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमची वेब सीरिज तांडव ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा वाद अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अनेक राज्यांमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी तांडव या वेब सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. संविधात देण्यात आलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र ही अमर्याद नाही, असंही न्यायालयानं बुधवारी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. तर आज या प्रकरणी न्यायालयात पुन्हा सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान तुम्ही स्क्रिप्ट वाचूनच करार सही केला. कलाकारांना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं म्हटंल. यावर बॉलिवूडची अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं प्रतिक्रिया दिली आहे.
"जेवढे लोकं या शोमध्ये असतात तेवढे सगळे जण स्क्रिप्ट वाचतात आणि त्यानंतरच करारावर स्वाक्षरी करतात. तर चला संपूर्ण कास्ट आणि क्रूला अटक करा?," असं कोंकणा सेन यावेळी म्हणाली. तिनं ट्विटरच्या माध्यमातून याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.
Almost all involved in the show have read the script and signed the contract! Let’s arrest the whole cast and crew? https://t.co/xbqbQ641D7
— Konkona Sensharma (@konkonas) January 28, 2021
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अभिनेता झीशान अय्यूबच्या वकिलांना न्यायालयाला सांगितलं की तो केवळ एक अभिनेता आहे. त्याच्यासोबत ती भूमिका साकारण्यासाठी करार करण्यात आला आहे. "तुम्ही एक अभिनेते आहात. तुम्ही स्क्रिप्ट वाचूनच करार स्वीकारता. तुम्ही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू शकत नाही," असं न्यायमूर्ती एम.आर.शाह म्हणाले.