Social Media वर व्हायरल होतो तैमुरच्या डुप्लिकेटचा फोटो; पाहा कोण आहे हा चिमुकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:00 IST2021-10-27T19:00:00+5:302021-10-27T19:00:00+5:30
Taimur ali khan:सध्याच्या घडीला लोकप्रिय स्टारकिडपैकी तैमुर अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे इतक्या लहान वयात तैमुरची लोकप्रियता तुफान वाढली आहे.

Social Media वर व्हायरल होतो तैमुरच्या डुप्लिकेटचा फोटो; पाहा कोण आहे हा चिमुकला
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (kareena kapoor khan) आणि सैफ अली खान (saif ali khan) यांचा लेक तैमुर (Taimur ali khan) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. सध्याच्या घडीला लोकप्रिय स्टारकिडपैकी तैमुर अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे इतक्या लहान वयात तैमुरची लोकप्रियता तुफान वाढली असून मध्यंतरी त्याच्या सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बाहुल्यादेखील बाजारात आल्या होत्या. परंतु, सध्या तैमुर त्याच्या डुप्लिकेटमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा फोटो व्हायरल होत असून हा चिमुकला हुबेहूब तैमुरसारखा दिसत आहे.
विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमुर आणि एका चिमुकल्याचा फोटो कोलाज करुन टाकला आहे. या फोटोमध्ये दिसत असलेला चिमुकला अगदी तैमुरसारखा दिसत असल्याचं पाहायला मिळतं. या फोटोसोबत त्यांनी त्या चिमुकल्याचं नावही सांगितलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चिमुकल्याचं नाव जरयान थापर ( Zaryan Thapar) असं आहे. जरयानचा फोटो पाहिल्यावर तो अगदी तैमुरसारखाच दिसत असल्याचं लक्षात येतं. त्याचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी, इतक्या लहान वयात मुलांची तुलना करु नका असं म्हटलं आहे. तर, काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.