ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 06:56 PM2024-09-24T18:56:34+5:302024-09-24T19:13:18+5:30

दिग्गज व्यक्तीचा मुलगा असूनही त्याला ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट करण्यात आलं.

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नाही. असंच काहीसं सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्यासोबत घडलं. दिग्गज व्यक्तीचा मुलगा असूनही त्याला ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट करण्यात आलं.

हा लोकप्रिय अभिनेता म्हणजे पंकज कपूर यांचा मुलगा शाहिद कपूर आहे. ज्याने २००३ मध्ये चॉकलेट हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 'इश्क विश्क' हा अभिनेत्याचा पहिला चित्रपट होता.

शाहिदचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तो रातोरात स्टार झाला आणि त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. पण स्टार किड असूनही शाहिदसाठी यशाचा हा प्रवास सोपा नव्हता.

एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं होतं की, माझे वडील पंकज कपूर आहेत, त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम मिळणं सोपं जाईल असं सर्वांना वाटायचं. पण तसं अजिबात नाही.

शाहिदने सांगितलं की, " आयुष्यात एक असा टप्पा होता जेव्हा त्याला १०० वेळा ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्याकडे खायला किंवा ऑडिशनला जायलाही पैसे नव्हते."

"मी माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग पाहिले आहेत." 'वाह लाइफ हो तो ऐसी', 'शिखर' आणि 'दिवाने हुए पागल' सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अभिनेता डिप्रेशनचा सामना करत होता.

‘विवाह’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. जो त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र, त्यानंतरही शाहिदकडे कामाची कमतरता होती. कारण आता त्याला कोणत्या प्रकारच्या भूमिका ऑफर करायच्या हे कोणालाच समजत नव्हतं.

शाहिद कपूर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात दिसला होता. अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 'उडता पंजाब', 'पद्मावती', 'कबीर सिंह' सारखे हिट सिनेमे दिले आहे.

लोकप्रिय अभिनेता जवळपास ३०० कोटींचा मालक आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. शाहिद सोशल मीडियावर खपू एक्टिव्ह असून तो नेहमीच त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो.

शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. त्याला दोन गोड मुलं देखील आहेत. तो नेहमीच आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसतो.