"मिले हो तुम हमको, बडे नसीबों से..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेहा कक्करची रोमॅंटिक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:54 PM2024-10-24T15:54:12+5:302024-10-24T15:59:36+5:30
नेहा कक्कर (Neha Kakkar) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे.
Neha Kakkar : नेहा कक्कर (Neha Kakkar) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका आहे. आपल्या सुमधूर आवाजाने तिने प्रेक्षकांना कायमच मंत्रमुग्ध केलं. २०२० मध्ये तिने रोहनप्रीत सिंगबरोबर लग्नगाठ बांधली. नेहा कक्कर तिच्या गाण्यांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येते. नुकतीच सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेहाने नवऱ्याला रोमॅंटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
नेहा आणि रोहनप्रीतने २४ ऑक्टोबर, २०२० मध्ये लग्न केलं होतं. नुकतीच त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, नेहाने कक्कर नेहमीच पती रोहनप्रीत सिंगसोबतचे 'हॅपी' फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने त्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "लग्नाला कधी ४ वर्षे झाली कळलंच नाही. रोहन तुझे मनापासून आभार तू अगदी लहान मुलं असल्याप्रमाणे सांभाळतोस. असे वाटतंय की, तू माझं वय वाढूच देणार नाहीस! Love you buddy!!!!!! Happy Anniversary to Us!" असं म्हणत नेहाने नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
दिल्लीतील गुरुव्दारामध्ये नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न झालं. २४ ऑक्टोबर, २०२० ते दोघे विवाहबंधनात अडकले. रोहनप्रीत सिंगबद्दल सांगायचं झालं तर तो ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत.