वडिलांच्या 'या' अटीमुळे एकता अजूनही अविवाहित? लग्न न करण्यावर पहिल्यांदाच झाली व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 03:21 PM2024-01-04T15:21:43+5:302024-01-04T15:22:49+5:30

Ekta kapoor: एकताने तिच्या क्रशचं नावही एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

bollywood producer ekta-kapoor-love-life-story | वडिलांच्या 'या' अटीमुळे एकता अजूनही अविवाहित? लग्न न करण्यावर पहिल्यांदाच झाली व्यक्त

वडिलांच्या 'या' अटीमुळे एकता अजूनही अविवाहित? लग्न न करण्यावर पहिल्यांदाच झाली व्यक्त

टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध नाव म्हणजे एकता कपूर (ekta kapoor).  आजवरच्या कारकिर्दीत एकताने अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर तिचा कायमच बोलबाला असतो. एकताच्या प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यात तिच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'बडे अच्छे लगते है', यासारख्या असंख्य मालिका विशेष गाजल्या.  त्यामुळे कलाविश्वातील यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. एकताला एक मुलगादेखील आहे. मात्र, तिने अद्यापही लग्न केलेलं नाही. त्यामुळेच लग्न न करण्यामागे तिचं काही खास कारण आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडतो.

एकताने लग्न न करण्यामागे एक खास कारण असल्याचं म्हटलं जातं. काहींच्या मते, वडील जितेंद्र यांच्या एका अटीमुळे तिने लग्न केलं नाही. तर, काहींच्या मते आजही ती खऱ्या प्रेमाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे एकताने लग्न न करण्यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात.

एकताने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. यावेळी तिने तिच्या वडिलांची एक अट असल्याचंही सांगितलं होतं. "माझ्या वडिलांनी मला एक सांगितलं होतं. एक तर तू काम कर किंवा मग लग्न कर. मग काय मी काम करण्याचा पर्याय निवडला. मी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींचे लग्न आणि घटस्फोट होतांना पाहिले आहेत. त्यामुळेच कदाचित मी अजूनही लग्न करण्याची वाट पाहतीये", असं एकता म्हणाली.

दरम्यान, एकताने  सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या क्रशचं नाव सुद्धा सांगितलं होतं. हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून चंकी पांडे आहे. चंकी पांडेच्या वाढदिवशी एकताने एक पोस्ट शेअर करत तो तिचा क्रश असल्याचं सांगितलं होतं. ''काही वर्षांपूर्वी मी चंकी पांडेच्या प्रेमात पडले होते. जर तो तयार झाला असता तर मी आज बॉलिवूड वाइफ असते'', असं ती म्हणाली होती.

Web Title: bollywood producer ekta-kapoor-love-life-story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.