धक्कादायक! सोनू निगमच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट; पोस्ट शेअर करत चाहत्यांना केलं सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:28 IST2025-04-22T11:23:05+5:302025-04-22T11:28:54+5:30
सध्याच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.

धक्कादायक! सोनू निगमच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट; पोस्ट शेअर करत चाहत्यांना केलं सावध
Sonu Nigam: सध्याच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीमंडळी देखील या माध्यमाचा वापर करत आहेत. अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कलाकार फेसबुक, इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. परंतु या सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत. यामुळे कलाकारांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. असंच काहीसं बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक सोनू निगमच्या (Sonu Nigam) बाबतीत घडलं आहे. गायकाच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल सोनू निगमने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
सोनू निगम सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. त्याद्वारे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देतो. नुकतीच सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काही लोक आपल्या नावाचा चुकीचा वापर करत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. दरम्यान इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोनू निगमने चाहत्यांना सावध करत लिहिलंय की, "अलिकडेच मला काही लोक माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत, याबद्दल समजलं. माझ्या टीमने कधीही कोणाशीही संपर्क साधला नाही. जर कोणी माझ्या टीममधून असल्याचा दावा करत तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर सावधगिरी बाळगा." याशिवाय गेली आठ वर्ष आपण एक्सवर सक्रिय नसल्याचंही त्याने सांगितलं आहे. सोशल मीडियावर अशा पोस्टद्वारे वादग्रस्त कंटेंट पसरवण्याचा प्रयत्न देखील काहीजण करत आहेत. असा खुलासा सोनू निगमने या पोस्टमध्ये केला आहे.
पुढे त्याने लिहिलंय, "जर तुम्हाला माझ्या नावाने कोणतेही बनावट अकाउंट किंवा मेसेज दिसला तर कृपया ते ब्लॉक करा आणि ताबडतोब तक्रार करा. माझ्या कुटुंबाचे, तसेच सर्व चाहत्यांचे आभार... जे माझ्यासोबत आहेत आणि मला समजून घेत आहेत."
दरम्यान, सोनू निगमची ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहते चिंतेत आहे.