सोनू निगम ते साईराम अय्यर! मेल-फिमेल दोन्ही आवाजात गातात 'हे' प्रसिद्ध गायक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:12 PM2022-02-24T18:12:28+5:302022-02-24T18:13:10+5:30
Bollywood singer: आजवर असे अनेक गायक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या शैलीत गाणी सादर केली. यात आज आपण अशा गायकांविषयी जाणून घेणार आहोत जे स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही आवाजात सहज गातात.
बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक गायक (Bollywood Singer) आहेत ज्यांची आपल्या मधूर आवाजाच्या जोरावर कानसेनांना तृप्त केलं आहे. यामध्ये सोनू निगम, सुनिधी चौहान, शंकर महादेवन या लोकप्रिय गायकांचं नाव तर कायम अग्रस्थानी घेतलं जातं. या गायकांनी केवळ श्रोत्यांचं मनोरंजनच केलं नाही. तर, त्यांच्या मनात हक्काचं स्थानही निर्माण केलं. विशेष म्हणजे आजवर असे अनेक गायक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या शैलीत गाणी सादर केली. यात आज आपण अशा गायकांविषयी जाणून घेणार आहोत जे मेल आणि फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष (Male-Female voice Artist) या दोघांच्याही आवाजात सहज गातात.
सोनू निगम (Sonu Nigam) -
गेल्या कित्येक वर्षांपासून श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक म्हणजे सोनू निगम. आपल्या आवाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारा सोनू मेल आवाजासह फिमेल आवाजातही सहज गाणी म्हणतो. एका स्टेज परफॉर्मन्समध्ये त्याने लाइव्ह सुरु असताना फिमेल आवाजात गाणं म्हटलं होतं.
साईराम अय्यर (Sairam Iyer) -
पुरुष असूनही फिमेल आवाजात गाणाऱ्या गायकांच्या यादीत दुसरं नाव साईराम अय्यर यांचं येतं. साईराम यांनी अनेक गाजलेल्या मालिकांसाठी आवाज दिला आहे. एकेकाळी अनेक निर्माता किंवा दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटामध्ये डुएट सॉन्ग गाण्यासाठी साईराम यांना सांगायचे.
राणी कोहिनूर (Rani Kohenur) -
राणी कोहिनूर या नावाने खासकरुन ओळख निर्माण केलेल्या या गायकाचं खरं नाव सुशांत दिवगीकर आहे. ते इत्तम गायक असण्यासोबतच मॉडल, सायकोलॉजिस्ट, मोटिवेशनल स्पीकरदेखील आहेत. २०१८ मध्ये त्यांनी सा रे ग म पमध्ये आपल्या आवाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
जेली केई तामिन (Jelly Kai Tamin) -
अरुणाचल प्रदेशमधील जेली केई तामिन याने इंडियन आयडॉलच्या मंचावर स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात गाणं सादर करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.
साक्षी हरेंद्रन (Sakshi Harendran) -
साक्षी हरेंद्रन हे नाव आज अनेकांना माहित असेल. साक्षी एक मोटिवेशनल ट्रान्सजेंडर स्पीकर आहे. तिने तमिळ, मल्याळम भाषांमध्ये गाणी सादर केली आहेत.