102 Not out : असा असेल अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 05:49 AM2017-05-19T05:49:49+5:302017-05-19T11:19:58+5:30

तब्बल २६ वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या दोन दिग्गजांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यासाठी उमेश ...

102 Not Out: Amitabh Bachchan and Rishi Kapoor's Look !! | 102 Not out : असा असेल अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा लूक!!

102 Not out : असा असेल अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा लूक!!

googlenewsNext
्बल २६ वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या दोन दिग्गजांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. यासाठी उमेश शुक्ला यांना आपल्याला धन्यवाद द्यायलाच हवेत. होय, उमेश शुक्ला अमिताभ आणि ऋषी हे दोघे बाप-लेकाच्या भूमिकेत घेऊन येणार आहेत. (  उमेश शुक्ला यांनी ‘ज्युनिअर बच्चन’ अभिषेक बच्चन व ऋषी कपूर स्टारर ‘आॅल इज वेल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.) ‘१०२ नॉट आऊट’ या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अमिताभ १०२ वर्षीय वृद्धाची तर ऋषी कपूर ७५ वर्षांच्या त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा एका १०२ वर्षीय वयाच्या दत्तात्रय वखारिया या व्यक्तिरेखेभोवती फिरते. दत्तात्रय यावयातही कमालीचा महत्त्वाकांक्षी असतो. याऊलट त्याचा ७५ वर्षांचा मुलगा तितकाच सनकी आणि भावनाशून्य असतो. या चित्रपटातील अमिताभ व ऋषी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लूक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.

ALSO READ : ऋषी कपूरचे पुन्हा ट्विट, शिवी द्याल तर शिवीच मिळेल!

‘१०२ नॉट आऊट’ हा चित्रपट याच नावाच्या गुजराती नाटकावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात आधी परेश रावल यांची वर्णी लागली होती. पण आता परेश रावल यांच्या जागी ऋषी कपूर यांची वर्णी लागली आहे. मध्यंतरी हा चित्रपट गुंडाळण्यात आल्याची बातमी आली होती. पण आता या चित्रपटावर वेगाने काम सुरु झाले आहे. ऋषी कपूर व अमिताभ यांची जोडी १९९१ मध्ये ‘अजुबा’मध्ये अखेरची दिसली होती. त्यापूर्वी ‘अमर अकबर अ‍ॅन्थोनी’,‘नसीब’,‘कभी कभी’ यासारख्या हिट सिनेमात दिसले आहेत.

Web Title: 102 Not Out: Amitabh Bachchan and Rishi Kapoor's Look !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.